महसूल समाधान शिबिर

फाळेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

Mahasul Samadhan Shibir: “शासन आपल्या दारी, सेवा आपल्या गावात”या संकल्पनेअंतर्गत महसूल विभागाच्या वतीने फाळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले

फाळेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

Mahasul Samadhan Shibir

 

शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली (Mahasul Samadhan Shibir) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या “शासन आपल्या दारी, सेवा आपल्या गावात”या संकल्पनेअंतर्गत महसूल विभागाच्या वतीने फाळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाधान शिबिरात विविध शासकीय विभागांनी सहभागी होत नागरिकांना अनेक योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला.

कार्यक्रमास आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी माया वानखडे,  कांबळे यांच्यासह महसूल, पंचायत राज, महिला व बाल विकास, कृषी, सहकार, वन, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मत्स्यव्यवसाय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिबिरामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. 75 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल हप्त्यांची रक्कम वितरीत करण्यात आली. पूर्ण झालेल्या 10 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल चाव्यांचे वाटप, तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत 35 गर्भवती महिलांना बेबी किटचे वितरण करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत ५०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कृषी विभागामार्फत १५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, तर २० शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले. सहकार विभागाने पीक कर्जमाफी योजनेबाबत मार्गदर्शन केले. वन विभागामार्फत वृक्षलागवडीसाठी १,००० रोपांचे वितरण करण्यात आले.

महसूल विभागामार्फत २०० विद्यार्थ्यांना जात, नॉन-क्रिमिलेयर व रहिवासी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. (Mahasul Samadhan Shibir) सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत ५० निराधार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा, ५ लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा योजनेचा आणि २५ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला. याशिवाय २१ नागरिकांना फॅब्रिक अंथरुणे व ७/१२ उताऱ्यांचे वितरण, तसेच ५० पात्र लाभार्थ्यांना ई-शिष्यवृत्तीचे लाभपत्र देण्यात आले. शिबिरादरम्यान नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी, मागण्या व अर्ज सादर केले. संबंधित विभागांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बाल विकास, वन, सहकार तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागांच्या संयुक्त सहभागामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळाला. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व मागण्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने फाळेगाव येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या समाधान शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026