Pradeep Purnekar Murder

ठाणे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; चौथ्या आरोपीची ओळख पटली, पाचवा अद्याप फरार

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नितेश पवारची ओळख पटली. पोलिसांनी नऊ पथके तैनात केली असून मीरा रोडमधून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ठाणे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; चौथ्या आरोपीची ओळख पटली, पाचवा अद्याप फरार

नितेश पवार असे चौथ्या आरोपीचे नाव; भाच्याच्या गाडीचा गुन्ह्यात वापर केल्याचे तपासात समोर, मीरा रोडमधून पाच संशयित ताब्यात

ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे जात आहे. या घटनेनंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपींना तातडीने अटक करून कठोरात कठोर, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांवरही आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा दबाव वाढला आहे.

या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तब्बल नऊ पथके तैनात केली आहेत. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख निश्चित करण्यात आली आहे. नितेश पवार असे त्याचे नाव आहे. मात्र, हल्ल्यावेळी हेल्मेट घातलेल्या पाचव्या आरोपीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

या प्रकरणात आतापर्यंत पप्पू शिंदे, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार या चार आरोपींची ओळख पटली आहे. त्यापैकी पप्पू शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांकडून त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचीही माहिती गोळा केली जात आहे.

भाच्याच्या वाहनाचा वापर

तपासात नितेश पवारने या गुन्ह्यासाठी आपल्या भाच्याच्या गाडीचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वाहनाचा वापर नेमका कशाप्रकारे करण्यात आला, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दोन महिला आणि दोन पुरुषांची चौकशी

दरम्यान, पोलिसांनी काल दोन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले होते. ठाणे युनिट पाचमध्ये या चौघांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात असलेल्या दोन महिलांची महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. पूर्णेकर हत्या प्रकरणाशी या चौघांचा नेमका काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

मीरा रोडमधून पाच संशयित ताब्यात

या प्रकरणात मीरा रोड येथूनही पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. करिष्मा संतोष कनोजिया, रेणू अच्छेलाल मौर्य, सुनील कुसंता कनोजिया आणि रोशन रामबोध कैरी अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्व मानपाडा आणि मनोरमा नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून तपासातून काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या हत्याकांडातील इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत संतोष मेहिलाल कनोजिया याला पोलिसांनी अटक केली आहे. पाचव्या आरोपीने हेल्मेट परिधान केल्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून उपलब्ध पुरावे आणि तपासाच्या विविध बाजू तपासल्या जात आहेत.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून तिघांना अटक झाली आहे. CCTV, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे.

Oct 03, 2026