Peth Vadgaon Murder

पेठवडगावमध्ये थरार! 'ती माझी पत्नी आहे' म्हणत जमावासमोर पत्नीवर कोयत्याने सपासप वार

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे बुधवारी सायंकाळी भररस्त्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला.

पेठवडगावमध्ये थरार! 'ती माझी पत्नी आहे' म्हणत जमावासमोर पत्नीवर कोयत्याने सपासप वार

Peth Vadgaon Murder

WhatsApp स्टेटसनंतर रक्तरंजित शेवट; आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे बुधवारी सायंकाळी भररस्त्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, हा हल्ला करण्यापूर्वी आरोपीने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसमधून हत्येचा इशारा दिल्याची बाब समोर आली असून, प्राथमिक तपासात हा प्रकार पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत महिलेचे नाव अमृता दीपक कांबळे (वय 30) असून, संशयित आरोपी दीपक लाडू कांबळे (वय 35, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) हा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.

व्हॉट्सॲप स्टेटसमधून दिला होता इशारा

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी दीपक कांबळे याने घटना घडण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर 'आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट' तसेच 'आज माझा तरी शेवट नाहीतर... पुढच्याचा' अशा आशयाचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. या डिजिटल पुराव्याच्या आधारे पोलिसांकडून हत्येच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने तपास सुरू आहे.

एसटी स्टँड परिसरात भररस्त्यात हल्ला

बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अमृता कांबळे या पेठवडगाव एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी दीपक कांबळे तेथे पोहोचला. दोघांमध्ये झालेला वाद काही क्षणांतच उग्र झाला आणि आरोपीने जवळील धारदार कोयता काढून अमृता यांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर सलग वार केले.

या भीषण हल्ल्यात अमृता कांबळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू असूनही अनेक नागरिक हा प्रकार पाहण्यासाठी जमा झाले होते.

'ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका'

हल्ला सुरू असताना काही धाडसी तरुणांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, 'ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका' असे सांगत दीपकने त्यांना दूर राहण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अमृता यांच्यावर पुन्हा कोयत्याने वार केले. हल्ल्यानंतर 'विषय संपवला' असे म्हणत मिशीवर ताव मारत तो घटनास्थळावरून पसार झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट

दीपक आणि अमृता कांबळे यांचा सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपक पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच संशयातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे तसेच हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत आणि कुलदीप मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने व अन्य पुरावे संकलित केले असून, अमृता कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. फरार आरोपी दीपक कांबळे याचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026