गोमाता सन्मान रॅली

गोमाता सन्मान आवाहन अभियानांतर्गत पातुरात भव्य रॅली; तहसील कार्यालयावर निवेदन सादर

Go mata Samman Rally: पातुर येथे गोमाता सन्मान आवाहन अभियानांतर्गत भव्य रॅली आयोजित केली गेली. गोभक्तांनी गोहत्याबंदी व संवर्धनासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली.

गोमाता सन्मान आवाहन अभियानांतर्गत पातुरात भव्य रॅली; तहसील कार्यालयावर निवेदन सादर

Go mata Samman Rally

पातुर (Go mata Samman Rally) : गोवंश रक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती तसेच गोहत्याबंदी संदर्भात कठोर कारवाईची मागणी करत “गोमाता सन्मान आवाहन अभियान” अंतर्गत पातुर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला गोभक्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सुरू असलेल्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पातुर तहसील कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आले. मोठ्या संख्येने गोभक्त, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध गोशाळांचे संचालक या रॅलीत सहभागी झाले होते. महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत गोमातेप्रती आपले प्रेम व्यक्त केले.

रॅलीदरम्यान संत-महंतांनी कीर्तनाच्या माध्यमातून गोसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली. “गोमाता ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तिचे संरक्षण आवश्यक आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच गोहत्याबंदीबाबत अधिक कठोर कायदे करण्याची मागणीही करण्यात आली. रॅलीत घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. “जोपर्यंत गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील,” असा निर्धार यावेळी गोभक्तांनी व्यक्त केला.

ही (Go mata Samman Rally) रॅली यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाज, गोभक्त, गोशाळा संचालक व जागरूक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. भविष्यातही असे आंदोलन सुरू राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

 

 

संबंधित सामग्री

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
पावसाचा जोर वाढला, पण शेतकरी हटले नाहीत; प्रकाश पोहरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी

पावसाचा जोर वाढला, पण शेतकरी हटले नाहीत; प्रकाश पोहरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी

नागभीड तहसील कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. हजारो शेतकरी पावसातही ठामपणे उपस्थित राहिले.

Sep 17, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
वसमत तहसील कार्यालयावर बाभूळगाव व टेंभुर्णी सर्कल मधील मराठा समाजातर्फे ट्रॅक्टर रॅली

वसमत तहसील कार्यालयावर बाभूळगाव व टेंभुर्णी सर्कल मधील मराठा समाजातर्फे ट्रॅक्टर रॅली

Vasmat Maratha Samaj Rally: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणास बसलेले संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sep 11, 2026