गर्भवती महिला मृत्यू

परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

Pregnant woman Death: जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

Pregnant woman Death

 

१०८ रुग्णवाहिका दोन तास आली नसल्याचा आरोप; पाच जणांवर कोतवालीत गुन्हा

परभणी (Pregnant woman Death) : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक, डॉक्टर व निवासी वैद्यकीय अधिकार्‍यासह पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अमीन शेख अयुब (रा. साठे नगर, नेवाती मोहल्ला, जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीची पत्नी मरजीनाबी अमीन शेख (वय २२) ही सात महिन्याची गर्भवती होती. तिचा रक्तदाब कमी झाल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा संपर्क साधूनही सुमारे दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. दरम्यान महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाली.

नंतर संबंधित डॉक्टरांनी रुग्णाला रेफर करता येणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक केशव यादव, मोहम्मद जलाल, डॉक्टर अभिजित इप्पर, डॉक्टर कुलदीप चोरमले तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०६(१) व २१२ या कलमा अन्वये गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात करण्याची मागणी केली.

त्यानुसार मृतदेह नांदेड येथे पाठविण्यात आला असून रविवारी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कारभारावरही गंभीर आरोप केले आहेत. (Pregnant woman Death) रुग्ण व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. तसेच मयत महिलेचा मृतदेह कुठे ठेवण्यात आला होता, याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.

संबंधित सामग्री

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

Sep 23, 2026