विधान परिषद मतदान

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघा साठी १८ जून रोजी मतदान

Legislative Council Election: परभणी-हिंगोलीच्या जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांमधून १८ जून रोजी ८:०० ते १६:०० वेळेत ४६६ मतदारांना निवडणूक देण्याचा अवसर मिळेल. मतदारांसाठी पहिला पुरावा

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघा साठी १८ जून रोजी मतदान

Legislative Council Election

 

मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत

हिंगोली (Legislative Council Election) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.

मतदानासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. तहसीलदार कार्यालय, (Legislative Council Election) परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व  शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे १२८ मतदार मतदान करणार आहेत. 

तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ५९ मतदार मतदान करतील. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 

तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ७४ मतदार मतदान करतील. तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५८ मतदार आहेत. तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे २३ मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सदर निवडणुकीमध्ये एकूण ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी २५३ स्त्री मतदार तर २१३ पुरुष मतदार आहेत. या (Legislative Council Election) मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य,  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती,  शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे. 

संबंधित सामग्री

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबण्याची शक्यता; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी, तर जानेवारी २०२७ मध्ये निवडणुकीची शक्यता.

Sep 15, 2026
कोरची नगरपंचायतीत सत्ता उलथापालथ; बहुमत गमावल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली

कोरची नगरपंचायतीत सत्ता उलथापालथ; बहुमत गमावल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Korchi Nagar Panchayat: तालुक्यातील कोरची नगरपंचायतीत सध्या मोठी राजकीय उलथापालथ झाली असून सत्ताधारी पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या नगरपंचायतीत बहुमतासाठी 9 सदस्यांची गरज

Jul 25, 2026
स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील ‘दोन अपत्य’ नियमाला सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा वैधता; लोकसंख्या नियंत्रणावर महत्त्वपूर्ण

स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील ‘दोन अपत्य’ नियमाला सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा वैधता; लोकसंख्या नियंत्रणावर महत्त्वपूर्ण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारीसाठी लागू असलेल्या ‘दोन अपत्य’ नियमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे.

Jul 15, 2026
पक्ष विस्तारासाठी झोकून देऊन काम करा: प्रा. खेडेकर

पक्ष विस्तारासाठी झोकून देऊन काम करा: प्रा. खेडेकर

Shiv Sena (UBT) Meeting: गद्दार सोडून गेलेतरी पक्ष संघटना आहे तिथेच जबाबदारीने आणि निष्ठेने काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे पक्षाची पाळंमुळं आज जनमानसांमध्ये खोलवर रुजल

Jul 12, 2026