आंतरवाली सराटीहून परभणी परतताना कारचा अपघात; दोघे जखमी!

परभणीच्या पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर रविवारी  पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

आंतरवाली सराटीहून परभणी परतताना कारचा अपघात; दोघे जखमी!

NH61 Accident

पोहेटाकळी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील घटना

परभणी (NH61 Accident) : परभणीच्या पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर रविवारी  पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अपघातग्रस्त गाडीतील मराठा बांधव गेले होते. तेथून रविवार ३१ मे रोजी पहाटे ३.३० ते ४ वा. सुमारास

आपल्या गावाकडे परत येत असताना पोहेटाकळी शिवारातील कृषी महाविद्यालय व डाव्या कालव्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर त्यांची एमएच २२ एडब्ल्यू ५५७६ क्रमांकाची कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली.
या अपघातात वाहनातील पाच प्रवाशांपैकी दोघांना दुखापत झाली. जखमींना काही नागरीकांनी तातडीने  उपचारासाठी पाथरी शहरातील वरद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी गजानन आहेर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पहाटेच्या वेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 361 वरील भाटेगाव कालव्यावरील अपघाताची मालिका अखंड सुरूच आहे. पपई वाहतूक करणारे बुलेरो वाहन सायंकाळी पलटी झाले

Aug 30, 2026
तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Aug 24, 2026
परभणीत व्यापार्‍याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर...!

परभणीत व्यापार्‍याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर...!

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसविण्यात आलेल्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर विनापरवाना तोडण्यात आली.

Aug 09, 2026
परभणीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला साडेपाच कोटींचा चुना; धान्य खरेदी करून पैसे न देता फरार

परभणीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला साडेपाच कोटींचा चुना; धान्य खरेदी करून पैसे न देता फरार

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Jul 18, 2026
परभणीवर शोककळा! श्रीक्षेत्र गुंजचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे भीषण अपघातात निधन; भाविकांमध्ये हळहळ

परभणीवर शोककळा! श्रीक्षेत्र गुंजचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे भीषण अपघातात निधन; भाविकांमध्ये हळहळ

परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत दुःखद घटना घडली आहे.

Jul 17, 2026