Newborn Baby Sale

नवजात बालक विक्रीप्रकरणी भाजपशी संबंधित दोन महिलांना अटक; न्यायालयीन कोठडी

चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या नवजात बालकांच्या विक्रीप्रकरणी रामनगर पोलिसांनी भाजपशी संबंधित आणखी दोन महिलांना अटक केली आहे.

नवजात बालक विक्रीप्रकरणी भाजपशी संबंधित दोन महिलांना अटक; न्यायालयीन कोठडी

Newborn Baby Sale

रामनगर पोलिसांची कारवाई; मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे

चंद्रपूर (Newborn Baby Sale) : चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या नवजात बालकांच्या विक्रीप्रकरणी रामनगर पोलिसांनी भाजपशी संबंधित आणखी दोन महिलांना अटक केली आहे. या दोन्ही महिलांना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मे महिन्यात चंद्रपूरमध्ये दोन नवजात बालकांची पैशांच्या मोबदल्यात विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तपासादरम्यान एका महिलेने आर्थिक लाभासाठी स्वतःच्या दोन नवजात बालकांची विक्री केल्याचे समोर आले. तसेच तिच्या अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या नवजात बालकाचीही विक्री करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आणि संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.

या प्रकरणात यापूर्वी संबंधित महिला, बालकांना विकत घेणाऱ्या दोन महिला तसेच या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार अजय फुलझेले यांना अटक करण्यात आली होती. आरोपींविरुद्ध मानवी तस्करीसंदर्भातील तरतुदींसह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान या प्रकरणात भाजपशी संबंधित येरणे आणि हांडे या दोन महिलांचा सहभाग असल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या दोघी सुरुवातीला या प्रकरणात साक्षीदार म्हणून समोर आल्या होत्या. मात्र, तपासात त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026