Nashik Crime News

एकतर्फी प्रेमाची भीषण परिणती? नाशिकमध्ये तरुणीची हत्या; पहाटे आरोपीचा मृतदेह सापडला

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे.

एकतर्फी प्रेमाची भीषण परिणती? नाशिकमध्ये तरुणीची हत्या; पहाटे आरोपीचा मृतदेह सापडला

जळगावच्या तरुणीवर इंदिरानगरमध्ये चाकूने हल्ला; पहाटे जॉगिंग ट्रॅकवरील झाडाला संशयिताचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला

नाशिक : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री एका तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत शनिवारी पहाटे संशयित आरोपी तरुणाचा मृतदेह जॉगिंग ट्रॅक परिसरात आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी वैष्णवी अनिल आवारे ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी होती. ती अवघ्या 15 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आली होती आणि इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीमध्ये पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. तिच्या मागोमाग यवतमाळ येथील संशयित तरुणही नाशिकमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास, वैष्णवी वनसंपदा सोसायटीच्या गार्डन परिसरातून जात असताना संशयिताने तिचा रस्ता अडवला. त्यानंतर धारदार चाकूने तिच्यावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

दरम्यान, पोलिसांकडून रात्रीभर संशयिताचा शोध सुरू असतानाच शनिवारी पहाटे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जॉगिंग ट्रॅक परिसरात एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. वैष्णवीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःचेही जीवन संपवले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026