योग शिबिर

लठ्ठपणा निवारण्यासाठी योग काळाची गरज; २१ दिवसीय योग शिबिराचा समारोप

Yoga camp: नांदेडमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व स्वामी विवेकानंद योग सेंटरने आयोजित लठ्ठपणा कमी करण्यासाठी २१ दिवसीय योग शिबिराचा उत्साहात समारोप झाला.

लठ्ठपणा निवारण्यासाठी योग काळाची गरज; २१ दिवसीय योग शिबिराचा समारोप

Yoga camp

नांदेड (Yoga camp) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व स्वामी विवेकानंद योग सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लठ्ठपणा निवारण्यासाठी योग' या विषयावरील २१ दिवशीय नि:शुल्क योग शिबिराचा नुकताच उत्साहात समारोप झाला. आधुनिक जीवनशैलीत योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून आयुष मंत्रालय प्रमाणित योग शिक्षक राघव दंडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्य योग शिक्षिका अर्चना तोटावाड यांनी सर्व साधकांचे स्वागत करून आभार मानले.

या २१ दिवसांच्या शिबिरात (Yoga camp) साधकांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्यक सूक्ष्म क्रिया, बैठक स्थितीतील आसने, पाठीवरील व पोटावरील आसने, विविध प्राणायाम, बंध व मुद्रा यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच यौगिक जॉगिंग, सूर्य नमस्कार व ध्यानाचे विशेष सत्र घेण्यात आले. शिबिराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अरुण पाटील, वीरभद्र धोंडगे, राम भुसेवाड, संभाजी धुमाळ, रामराव भोसले, सुरेखा भोसीकर व मीरा स्वामी यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण परडे, विजय गोविंदवाड, लता काळे व मीना कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026