कळमनुरी (MLA Santosh Bangar) : शहरातील विकासनगर परिसरात राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना 2025-26 अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या 'नमो उद्यान'चे लोकार्पण आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शिवसेना युवा जिल्हाप्रमुख राम कदम, नगराध्यक्ष आश्लेषा वैभव पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी रविराज दरक, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, वैभव उर्फ आर. आर. पाटील, गजानन पाटील, नगरसेवक प्रकाश नाईक, नगरसेवक रवी शिंदे, नगरसेवक शैलेश उबाळे, नगरसेवक खाजा बागवान, अब्दुल्ला पठाण, माजी नगराध्यक्ष सुवर्णा संदीप गाभणे, राजू पटणे, अक्षय ढगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्यानामुळे विकासनगर परिसरातील नागरिकांना सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज व सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कळमनुरीत आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते 'नमो उद्यान'चे लोकार्पण
MLA Santosh Bangar: 'नमो उद्यान' शहरातील विकासनगर परिसरात एक कोटी रू. निधीतून बांधले जात आहे. या उभारणेच्या वेळी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते समर्पण केला गेला.
MLA Santosh Bangar
संबंधित सामग्री
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही
नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत
जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय
अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?
राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.