Buldhana Drought

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

खरीप हंगाम सुरू होऊन पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही बुलढाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Buldhana Drought

खरीप पिकांचे पंचनामे, चारा छावण्या आणि टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी; कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चिखली : खरीप हंगाम सुरू होऊन पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही बुलढाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक अडचणीत आले असून, जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते विश्वदिप पडोळ पाटील आणि प्रदेश युवक सचिव शिवराज पाटील यांनी शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्ह्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पावसाअभावी करपलेली पिके, उगवण न झालेली पिके आणि दुबार पेरणीनंतर झालेले नुकसान यांची स्वतंत्र नोंद घेऊन बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असताना केवळ पर्जन्यमानाची आकडेवारी किंवा तांत्रिक निकष यांच्याच आधारे निर्णय घेऊ नये, अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली आहे. प्रत्यक्ष शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार करून बुलढाणा जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे आवश्यक प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाअभावी आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या आणि चारा डेपो तातडीने सुरू करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तालुकानिहाय तसेच गावनिहाय चारा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

ज्या गावांमध्ये तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे किंवा भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.

या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विश्वदिप पडोळ, शिवराज पाटील, संदीप पैठणे, शमीम सौदागर, आसीफ सौदागर, शहेजाद हकीम, बाळाप्रसाद जैस्वाल, विशाल सावळे, निलेश राजपूत आणि जगूसेठ चौथे यांनी निवेदनातून दिला आहे.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026