Nagpur Engineer Suicide

नागपूरच्या 39 वर्षीय इंजिनिअरची गुरुकुंज मोझरीत आत्महत्या; कुटुंबीयांना लोकेशन पाठवल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

नागपूरमधील एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या 39 वर्षीय इंजिनिअरने गुरुकुंज मोझरी परिसरात आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

नागपूरच्या 39 वर्षीय इंजिनिअरची गुरुकुंज मोझरीत आत्महत्या; कुटुंबीयांना लोकेशन पाठवल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

कोराडी थर्मल पॉवर प्लांटमध्ये वरिष्ठ पदावर होते कार्यरत; मोबाईल जप्त करून तिवसा पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : नागपूरमधील एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या 39 वर्षीय इंजिनिअरने गुरुकुंज मोझरी परिसरात आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राम विनोद चौधरी असे मृताचे नाव असून, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राम विनोद चौधरी हे नागपूरमधील कोराडी थर्मल पॉवर प्लांटमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ते स्वतःच्या हुंडई कारने नागपूरहून अमरावतीच्या दिशेने आले होते.

गुरुकुंज मोझरी बायपासलगत असलेल्या राष्ट्रसंत पेट्रोलियमजवळ त्यांनी कार उभी केली. त्यानंतर जवळील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

सकाळी आठच्या सुमारास घटना उघडकीस

रविवारी सकाळी सुमारे आठ वाजता ही घटना निदर्शनास आली. माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्नी आणि नातेवाईकांना पाठवले होते लोकेशन

प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी चौधरी यांनी पत्नी आणि काही नातेवाईकांना गुरुकुंज मोझरी परिसरातील स्वतःचे लोकेशन पाठवले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्यातील माहितीची तपासणी केली जात आहे.

नागपूरहून इतक्या दूर गुरुकुंज मोझरी परिसरात येऊन त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. कुटुंबीय, नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026