खापरखेडा मध्ये रुग्णाला औषध पोहोचवून परतणाऱ्या तरुण फार्मसी चालकाचा अपघातात मृत्यू

रुग्णाला तातडीने औषध पोहोचवून नागपूरहून परतत असताना दहेगाव रंगारीजवळ झालेल्या भीषण अपघातात वलनी वस्ती (ता. सावनेर) येथील निखिल संजय चकोले (वय 29) या तरुण फार्मसी चालकाचा मृत्यू झाला.

खापरखेडा मध्ये रुग्णाला औषध पोहोचवून परतणाऱ्या तरुण फार्मसी चालकाचा अपघातात मृत्यू

Nagpur Accident

खापरखेडा (Nagpur Accident) : रुग्णाला तातडीने औषध पोहोचवून नागपूरहून परतत असताना दहेगाव रंगारीजवळ झालेल्या भीषण अपघातात वलनी वस्ती (ता. सावनेर) येथील निखिल संजय चकोले (वय 29) या तरुण फार्मसी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री नागपूर-सावनेर मार्गावरील सनराईज हॉटेलसमोर घडली.

निखिल चकोले यांचे दाभा, नागपूर येथे ‘न्यू लाईफ केअर’ नावाचे मेडिकल स्टोअर होते. रविवारी सुट्टीमुळे ते दिवसभर घरी होते. दरम्यान, एका रुग्णाला तातडीने औषध पोहोचवण्यासाठी त्यांना नागपूरला जावे लागले. रात्री काम पूर्ण करून ते आपल्या चारचाकी वाहनाने (एमएच-40/सीएच-4765) सावनेरकडे परतत होते.

प्राथमिक माहितीनुसार, दहेगाव रंगारी परिसरातील सनराईज हॉटेलसमोर त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन प्रथम रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकले. त्यानंतर वाहन डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेले व समोरून येणाऱ्या ट्रक (सीजी-07/बीझेड-8893) ला धडकले. या अपघातात निखिल गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच मित्रांनी व पोलिसांनी त्यांना तातडीने मॅक्स हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

निखिल यांनी वर्षभरापूर्वीच स्वतःची फार्मसी सुरू केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने वलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप सगणे करीत आहेत.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026