पुण्यात धक्कादायक प्रकार; सेक्रेटरीच्या खूनप्रकरणी भाजप विधी शाखा अध्यक्ष अटकेत

पुणे शहरातील मुंढवा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात भाजपच्या विधी शाखेचा स्थानिक अध्यक्ष ॲड. संजय सावंत याला त्याच्या कार्यालयातील सेक्रेटरीच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पुण्यात धक्कादायक प्रकार; सेक्रेटरीच्या खूनप्रकरणी भाजप विधी शाखा अध्यक्ष अटकेत

Murder Case Pune

पुणे (Murder Case Pune) : पुणे शहरातील मुंढवा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात भाजपच्या विधी शाखेचा स्थानिक अध्यक्ष ॲड. संजय सावंत याला त्याच्या कार्यालयातील सेक्रेटरीच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सावंतसोबत त्याची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीचाही सहभाग असल्याचा आरोप असून, तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव पूनम दिनेश मुन (वय ३५) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात सहाय्यक (सेक्रेटरी) म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, पूनम आणि संजय सावंत यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सावंत यांची पत्नी स्वाती हिला होता. याच संशयातून दोघींमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी, गुरुवारी (१६ एप्रिल) पूनम नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्या होत्या. त्यानंतर दुपारच्या सुमारास संजय सावंत, त्याची पत्नी आणि मुलीने मिळून पूनम यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांच्या पायांना दोरीने बांधून बॅटने बेदम मारहाण करण्यात आली. या गंभीर मारहाणीत पूनम यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून कार्यालयातच लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. पुढील दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

दरम्यान, पूनम घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या पती दिनेश यांनी दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुढील दिवशी सकाळी पूनम यांचे पती उद्धव मुन सावंत यांच्या कार्यालयात गेले असता, त्यांना तेथे एक संशयास्पद पोते दिसले. ते उघडून पाहिल्यानंतर त्यात पूनम यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026