परभणी दुचाकी-टिपर अपघात

परभणीच्या ताडकळस टीपॉईंटवर दुचाकी-टिपरचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार...!

Parbhani Bike-Tipper Accident: परभणी तालुक्यातील ताडकळस टीपॉईंटवर दुचाकी आणि टिपरच्या भीषण अपघातात एक तरुण मृत आणि त्याचे वडील गंभीर जखमी झाले. घटनेमुळे

परभणीच्या ताडकळस टीपॉईंटवर दुचाकी-टिपरचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार...!

Parbhani Bike-Tipper Accident

दुचाकीवरील मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी...!

परभणी/ पूर्णा (Parbhani Bike-Tipper Accident) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस टीपॉईंट परिसरात मंगळवारी सकाळी दुचाकी आणि भरधाव टिपरमध्ये भीषण अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मो. सिद्दीक जिलानी (वय २१) हा आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून पूर्णा शहरातून ताडकळसकडे जात होता. दरम्यान, ताडकळस टीपॉईंट येथे भरधाव वेगाने येणाऱ्या टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मो. सिद्दीक याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील रौफ जिलानी (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून संबंधित टिपर ताब्यात घेतला आहे. (Parbhani Bike-Tipper Accident) घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ताडकळस टीपॉईंट परिसरात भरधाव वाहनांमुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक व पोलिस बंदोबस्ताची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026