परभणी मध्ये बिलिंग तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा लिपिक निलंबित

बिलिंग तक्रारींचा वेळेत व योग्य निपटारा न केल्यामुळे महावितरणच्या एका उच्चस्तर लिपिक कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

परभणी मध्ये बिलिंग तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा लिपिक निलंबित

MSEDCL Action

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी काढले आदेश; सेवेतील हलगर्जीपणा भोवला

परभणी (MSEDCL Action) : बिलिंग तक्रारींचा वेळेत व योग्य निपटारा न केल्यामुळे महावितरणच्या एका उच्चस्तर लिपिक कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता तथा सक्षम अधिकाऱ्यांनी १३ मे रोजी आदेश जारी केले आहेत. रमेश श्रीहरी आचार्य असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीज बिलासंदर्भातील तक्रारींवर आवश्यक ती कार्यवाही न केल्यामुळे एका ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित ग्राहकाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याबाबत त्याने जिल्हा उद्योग मित्र समितीकडे तक्रार दाखल केली होती.

रमेश आचार्य यांच्याकडे सन २०२५ पासून सेलू उपविभागातील बिलिंग मापदंड सुधारणा, गुणवत्तेची देखरेख आणि ग्राहकांना अचूक वीजबिल देण्याची जबाबदारी होती. मात्र त्यांनी या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले.

सेलू उपविभागात बिलिंग संदर्भातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपव्यवस्थापकांकडून पाहणी करण्यात आली. या तपासणीत सहाय्यक लेखापाल म्हणून कार्यरत असलेले आचार्य यांनी कामात निष्काळजीपणा केल्याचे आणि तक्रारींवर योग्य प्रतिसाद न दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांना यापूर्वी लेखी समजही देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कामकाजात सुधारणा न झाल्याने अखेर १३ मे रोजी त्यांना महावितरण सेवेतून निलंबित करण्यात आले.

दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

दरम्यान, सेलू उपविभागातील प्रलंबित बिलिंग तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी विभागीय कार्यालयातून दोन वरिष्ठ बिलिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपव्यवस्थापकांकडून पुढील तीन दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026