MPDA Act

चिखली पोलिसांची मोठी कारवाई: एक सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध, तर दोघे ३ महिन्यांसाठी तडीपार!

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने चिखली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

चिखली पोलिसांची मोठी कारवाई: एक सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध, तर दोघे ३ महिन्यांसाठी तडीपार!

चिखली : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने चिखली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिखली शहर व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला 'एमपीडीए' (MPDA) कायद्यान्वये एक वर्षासाठी बुलडाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच, इतर दोघा उपद्रवी व्यक्तींना तीन महिन्यांसाठी संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

सराईत गुन्हेगारावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी स्वप्निल उर्फ संपत गजानन काकफळे (वय २५ वर्ष) याच्याविरुद्ध 'एमपीडीए' (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बुलडाणा यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. १८ जुलै २०२६ रोजी स्वप्निल काकफळे याला एक वर्षासाठी बुलडाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

गुन्ह्यांची पार्श्वभूमी

स्वप्निल काकफळे याच्याविरुद्ध दुखापत करणे, जीवघेणा हल्ला, चोरी, रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणे, गांजा सेवन करून सार्वजनिक शांतता भंग करणे, जुगार खेळविणे तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरीचा प्रयत्न करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन आरोपी बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार

या कारवाईसोबतच पोलिसांनी शहरातील इतर दोन उपद्रवी घटकांवरही कठोर पाऊल उचलले आहे. साहिल राजेंद्र शिंगणे व अनिकेत शाम श्रीमंत या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ नुसार तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या दोघांनाही तीन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे व माननीय अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलडाणा येथील संजय भुजबळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, "शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. भविष्यातही सराईत गुन्हेगार, दहशत माजवणारे आणि समाजकंटकांविरुद्ध अशीच कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील."

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026
शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Buldhana Shiv Sena Akrosh: यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने..

Sep 29, 2026