पानकनेरगावात दारूचा बेकायदेशीर ‘डिलिव्हरी बार’

 सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावात येथील वाईन बार म्हणजे आता चार भिंतीतील दुकान उरलेले नाही, तर बाईकवर फिरणारे मोबाईल बार बनले आहेत.

पानकनेरगावात दारूचा बेकायदेशीर ‘डिलिव्हरी बार’

Mobile Bar

शासनाच्या नियमांची थट्टा सुरूच

पानकनेरगाव (Mobile Bar) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावात येथील वाईन बार म्हणजे आता चार भिंतीतील दुकान उरलेले नाही, तर बाईकवर फिरणारे मोबाईल बार बनले आहेत. फोन केला की काही मिनिटांत दारू घरपोच—असा सर्रास सुरू असलेला बेकायदेशीर धंदा थांबण्याचे नाव घेत नाही. नियम, परवाने आणि प्रशासन या साऱ्यांची उघडउघड थट्टा होत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई काही होईना

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हे सूसंस्कूत गाव आहे येथे सर्व समाजाचे लोक गोण्या गोविंदाने नांदत असतात सदरील येथील अनेक वर्षापासून अवैध दारुने लोकाचे संसार उध्वस्त झाले होते दोस्त दोस्त ना रहा अशी परिस्थिती निर्माण झाली होती गंभीर परिस्थिती पाहता गावकऱ्यांनी बेकायदेशीर असलेली दारू बंद करण्यासाठी एकत्रित येऊन अवैध दारू विरोधात आवाज उठवला.

गावची बिकट परिस्थिती पाहता सेनगाव पोलिसांनी अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामातून गावखऱ्यात कौतुक सुद्धा वेळोवेळी करण्यात आले व अजूनही सेनगाव पोलीसांचा अवैध दारूविक्रे त्यावर वचक कायम पहायला मिळत आहे.
पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामातून दारू बंद झाल्यामुळे गावकरी समाधान व्यक्त करताना दिसत होते. परंतु समाधानाची आस लागतात अशातच वाईन बार चालकांच्या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यात पुन्हा अस्वस्थ पसरली आहे.

‘फोन लावा… बाईक येईल!’

आतातर थेट वाईन बार चालकांकडून एक नवीन फंडा पहायला मिळतोय. फोन करा आणि दारू मिळवा. थेट बाईक दारू घेऊन दारात येईल या बेकायदेशीर कृत्यमूळे महिला व गावकर्यातआपले लहान लहान मुलं १८-१९ वयोगटातील छोटे मूल व्यसनाधीन आहारी जातील की काय या प्रकारामुळे चिंताग्रस्त दिसत आहेत.

येथे शासनमान्य ३ ते ४ वाईन बार असताना, त्यातील काही बार चालकांनी कायद्यालाच हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. वेळेआधी दुकाने उघडणे, ग्राहकांचे वय न तपासता दारू विक्री करणे आणि फोनवर ऑर्डर आली की थेट दारात पोहोच हा प्रकार इतका बिनधास्त सुरू आहे की जणू परवाना घरपोच विक्रीसाठीच मिळाला की काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

या गंभीर प्रकरणावर दैनिक देशोन्नतीने आधीच बोट ठेवले होते. त्या वृत्ताची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केली आणि काही दिवस हा गैरप्रकार थांबला. मात्र कारवाईचा धाक ओसरताच पुन्हा जुनाच खेळ सुरू झाला आहे. आजही बाईकवरून दारूची पार्सल घरोघरी पोहोचत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

बेकायदेशीर प्रकार नाही थांबला तर महिला व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र

दारू सहज उपलब्ध झाल्याने युवकांचे भविष्य धोक्यात येत असून, घरगुती वाद, भांडणे, अपघात आणि गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दारू दुकानात विकली जाते की घराघरांत पोहोचवली जाते असा थेट सवाल आता गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय पाळत ठेवून प्रत्यक्ष पुरावे जमा करावेत, दोषी बार चालकांवर कठोर कारवाई करावी, परवाने रद्द करावेत आणि बाईकद्वारे होणारी दारू डिलिव्हरी कायमची बंद करावी, अशी ठाम आणि संतप्त मागणी पानकनेरगावातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासन पुन्हा ‘दोन दिवसांची कारवाई’ करून शांत बसेल की या वेळी खरंच दारूच्या या मोबाईल बाजाराला लगाम घालेल—याकडे संपूर्ण सेनगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सेनगाव पोलीस अवैध दारू बंद करू शकतात तर मग उत्पादन शुल्क विभाग बेकायदेशीर वाईन बारवर कारवाई का करू शकत नाही असा सवाल ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे. उत्पादन शुल्क विभागाचे डोळे उघडून हा गैरप्रकार थांबत नसेल तर मग लवकरच महिलावर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं महिला वर्ग कडून सांगितले जात आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026