सोलापूरात धक्कादायक घटना; मदरशातील 53 वर्षीय मौलानावर दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

सोलापूरात धक्कादायक घटना; मदरशातील 53 वर्षीय मौलानावर दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Minor Girl Assault Case

सोलापूर (Minor Girl Assault Case) : सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. धार्मिक शिक्षणासाठी मदरशात येणाऱ्या एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच मदरशातील 53 वर्षीय मौलानाने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती मदरशात धार्मिक शिक्षण घेत होती. याच काळात मदरशाशी संबंधित असलेल्या मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी (वय 53, रा. सोलापूर) याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी मौलानावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

पॉक्सो (POCSO) कायदा म्हणजे काय?

POCSO (Protection of Children from Sexual Offences Act, 2012) हा भारतातील एक विशेष कायदा आहे, जो 18 वर्षांखालील मुला-मुलींना लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि शोषणापासून संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

पॉक्सो कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये

  • 18 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती "बालक" मानली जाते.
  • मुलगा आणि मुलगी दोघांनाही या कायद्याचे संरक्षण मिळते.
  • लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, अश्लील चित्रण, ऑनलाइन शोषण यांसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा आहेत.
  • बालकाची ओळख गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे.

अशा प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयांची तरतूद आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून घटनेची सर्व बाजूंनी पडताळणी केली जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकारीही तपासावर लक्ष ठेवून आहेत.

महिला सुरक्षेचा प्रश्न कधी सुटणार?

महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ कठोर कायदे करून सुटणार नाही, तर समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय त्यावर कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. आजही महिलांवरील अत्याचार, छेडछाड, लैंगिक शोषण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जलद न्यायव्यवस्था, गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्री-पुरुष समानता, परस्पर सन्मान आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंब, शाळा, समाज आणि प्रशासन या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच महिलांना निर्भयपणे जगता येईल. 

या घटनेमुळे धार्मिक व शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले आहे. प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
दुष्काळाचा मोठा निर्णय! सोलापूरमधून चारा बाहेर नेण्यावर प्रशासनाची बंदी

दुष्काळाचा मोठा निर्णय! सोलापूरमधून चारा बाहेर नेण्यावर प्रशासनाची बंदी

सोलापूरच्या 11 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; चारा-मुरघास जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी. पुढील 120 दिवसांचा चारा साठा सुरक्षित ठेवण्याचे नियोजन.

Sep 28, 2026
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.

Sep 23, 2026

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

Sep 22, 2026