सेनगाव बस दुर्घटना

मद्यधुंद चालकाच्या ताब्यात मानव विकास बस; विद्यार्थिनींच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

Sengaon Bus Accident: विद्यार्थिनींच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दि. २७ जुलै सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला.

मद्यधुंद चालकाच्या ताब्यात मानव विकास बस; विद्यार्थिनींच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

Sengaon Bus Accident

 

दाताडा बुद्रुक येथे ग्रामस्थांनी बस अडवून चालकाला जाब

सेनगाव (Sengaon Bus Accident) : सेनगाव तालुक्यातील कोळसा–सेनगाव–सापडगाव–सुकळी–दाताडा बुद्रुक–दाताडा खुर्द–वटकळी मार्गावर धावणाऱ्या मानव विकास मिशनच्या विद्यार्थिनींच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दि. २७ जुलै सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला. विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींना घेऊन बस दाताडा मार्गे वटकळीच्या दिशेने जात असताना चालकाच्या संशयास्पद हालचाली विद्यार्थिनींच्या लक्षात आल्या. बस भरधाव आणि अस्थिर पद्धतीने चालवली जात असल्याचे जाणवताच विद्यार्थिनींनी प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबविण्याची मागणी केली.

ही माहिती मिळताच दाताडा बुद्रुक येथील नागरिकांनी बस अडवून चालकाला जाब विचारला. चालकाची तपासणी केली असता तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आणि संतप्त वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दुसरा चालक घटनास्थळी बोलावण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची काळजी घेत बस हिंगोली आगारात रवाना करण्यात आली.

या गंभीर प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ करणाऱ्या संबंधित चालकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिस्तभंगात्मक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच मानव विकास मिशनच्या बस चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी व मद्यपान चाचणी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा निष्काळजीपणाला कोणतीही माफी देता येणार नाही. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026