चिखली युवासेना

सिंचन विहिरींच्या निधी व घरकुलाच्या रखडलेल्या कामात पारदर्शकता आणा; युवासेना जिल्हाप्रमुख आक्रमक

Chikhli Yuva Sena: शिवसेना-युवासेनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालत युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन

सिंचन विहिरींच्या निधी व घरकुलाच्या रखडलेल्या कामात पारदर्शकता आणा; युवासेना जिल्हाप्रमुख आक्रमक

Chikhli Yuva Sena

चिखली (Chikhli Yuva Sena) : शिवसेना-युवासेनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालत युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे शहर संघटक प्रीतमभाई गैची युवासेना शहर प्रमुख आनंद गैची यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले. सिंचन विहिरींच्या मंजूर निधीच्या वितरणात होत असलेला विलंब, घरकुल योजनांची रखडलेली कामे, लाभार्थ्यांना होणारा मनस्ताप तसेच ग्रामपंचायती स्तरावरील विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता राखली जात नसल्याचा आरोप करत शिवसेना-युवा सेनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जोरदार धडक देत घेराव आंदोलन करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी (Chikhli Yuva Sena) आंदोलकांनी शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांची कामे महिनोनमहिने प्रलंबित ठेवली जात असल्याचा निषेध व्यक्त केला. विशेषतः सिंचन विहिरींसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर वितरित होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, अनेकांना कर्जाचा बोजा सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांना मंजूर निधी वेळेवर न मिळाल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत असून, पावसाळ्यात त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

शासनाच्या योजनांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, सर्व प्रकरणांची पारदर्शक पद्धतीने छाननी व्हावी, निधीचे वितरण वेळेत करावे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत, "शासनाच्या योजना सामान्य नागरिकांसाठी असताना त्यांची अंमलबजावणी मात्र संथ गतीने होत आहे. शेतकरी आणि गोरगरिबांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील तर ही प्रशासनाची मोठी अपयशाची बाब आहे. नागरिकांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना-युवासेना अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल," असा इशारा दिला. घेराव आंदोलनानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना-युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी (Chikhli Yuva Sena) युवासेना जिल्हाप्रमुख नंदू  कऱ्हाडे, शहर प्रमुख श्रीरामभाऊ झारे, शहरसंघटक प्रीतमभाई गैची, उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, शहरप्रमुख युवानेते आनंद गैची, शिवसेना नेते लालसिंग मोरे, सखाराम पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल मिसाळ, हरीभाऊ इंगळे, छगनराव वानखेडे, राहुल मिसाळ, निवृत्ती घुबे, शुभम वानखेडे, मदनराजे आकाळ, उपशहर प्रमुख समाधान जाध,व रवीअप्पा पेठकर ,पुंजाजी शेळके, अनिल जावरे ,सोहेल शहा ,किसानसेना तालुकाप्रमुख नारायण वाणी, अशोकराव मोहिते ,दिनकर मोरे, गजानन डुकरे ,लक्ष्मण इंगळे ,राजू इंगळे, अंकुश इंगळे, संजय कदम ,प्रदीप सपकाळ, गजानन फोलाने ,दत्ता मेंद, कृष्णा फोलाने, गौतम गवई ,संजय सोळंकी, सिद्धेश्वर सोळंकी, सोपान भालेकर ,सुरज असोलकर  ,किशोर महाले, इम्रान शेख , अशोकराव भोसले ,मालोजी गुजर ,डॉक्टर प्रकाश काळे ,सुपडाजी कोऱ्हाळे ,गजानन काकडे ,सचिन जोशी ,सिद्धेश्वर ठेंग, वैभव ठेंग ,प्रदीप गरुड, वसंतराव चौरे ,रामदास जाधव, अंकुश डहाके, राजू लोखंडे, शिवाजी पंडित, गणेश वाघमारे, समाधान गायकवाड, कैलास गायकवाड, प्रल्हाद पवार ,गजानन शेळके ,समाधान पाटील, मंगेश मोळवंडे, तुषार वजगडे, अशी असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

वसमत नगर पालिकेच्या दोन नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द 

वसमत नगर पालिकेच्या दोन नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द 

Vasmat Municipal Council: वसमत नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द, यामध्ये काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान व राष्ट्रवादीचे शेख हबीब शेख बशीर

Aug 17, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणींचा संताप, योजनेच्या पैशांसाठी ठिय्या 

जिल्हाधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणींचा संताप, योजनेच्या पैशांसाठी ठिय्या 

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे संतापित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडक धरले. त्यांना पैशांची गरज असल्याने प्रशासनाला धारेवर धरले गेल्या.

May 20, 2026
मुंबईतील मेळाव्याच्या अनुषंगाने युवा सेनेच्या बैठकीत नियोजन

मुंबईतील मेळाव्याच्या अनुषंगाने युवा सेनेच्या बैठकीत नियोजन

मुंबईतील मेळावा यशस्वी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १३ एप्रिलला नांदेड येथे विशेष आढावा बैठक बोलावली आहे.

Apr 11, 2026