माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट

माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवायांसाठी जंगल परिसरात गुप्तपणे शस्त्रे व स्फोटक साहित्य जमिनीत पुरून ठेवत असल्याची माहिती समोर आली होती.

माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट

Maoist Operation

आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष मोहीम

गडचिरोली (Maoist Operation) : माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवायांसाठी जंगल परिसरात गुप्तपणे शस्त्रे व स्फोटक साहित्य जमिनीत पुरून ठेवत असल्याची माहिती समोर आली होती. या साहित्याचा वापर नक्षल सप्ताह, निवडणुका आदी प्रसंगी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद जवळपास संपुष्टात येत असताना, जंगलात लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ मे २०२६ रोजी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान माओवाद्यांनी पोमकें-बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.

​​​​​​​

या माहितीच्या आधारे २१ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त सहा तुकड्या तसेच बीडीडीएसची दोन पथके शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आली.

२२ मे रोजी पोमकें-बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसरात विशेष अभियान पथकांनी घेरा घालून कसून तपासणी केली. यावेळी बीडीडीएसच्या जवानांना एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जिग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, फुटबॉल पाईप (२० फूट) आदी माओवादी साहित्य आढळून आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच हे सर्व साहित्य जवानांच्या मदतीने नष्ट करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता व बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईतील सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026