एसटी आरक्षण मागणी

एसटी आरक्षण मागणी संदर्भात समाज बांधव आक्रमक!

ST Reservation Demand: एसटी आरक्षण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मानोरा तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजाच्यावतीने दि. ६  जुलै रोजी शासकीय विश्राम गृह येथे एसटी आरक्षण मागणी संदर्भात सविचार सभेचे आयोजन

एसटी आरक्षण मागणी संदर्भात समाज बांधव आक्रमक!

ST Reservation Demand

 

सहविचार सभा उत्साहात!

मानोरा (ST Reservation Demand) : संभाजीनगर येथे दि. १२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एसटी आरक्षण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मानोरा तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजाच्यावतीने दि. ६  जुलै रोजी शासकीय विश्राम गृह येथे एसटी आरक्षण मागणी संदर्भात सविचार सभेचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एसटी आरक्षणाच्या विषयावर सखोल चर्चा केली.

सभेला प्रा. डॉ. अनिल राठोड (वाशिम) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या कामकाजाबाबत तसेच (ST Reservation Demand) एसटी आरक्षणाच्या सद्यस्थितीवर सविस्तर मार्गदर्शन केले. आरक्षणाच्या लढ्याला समाजाने एकजुटीने आणि संघटितपणे पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. या सविचार सभेमध्ये समाजातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांनी एसटी आरक्षणाच्या अनुषंगाने आपापली मते, सूचना आणि भूमिका मांडल्या. समाजाच्या हक्कासाठी एकदिलाने लढा उभारण्याची गरज सर्व वक्त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी प्रमुख उपस्थितींमध्ये संजय महाराज, भाऊ नाईक, चिंतामण चव्हाण, रोहिदास राठोड, मनोहर जाधव, रामराव चव्हाण, मनोहर राठोड, श्याम राठोड, वसंता राठोड, विशाल राठोड, रोशन चव्हाण, नितीन राठोड, धर्मराज आडे, धनराज राठोड, रोहित राठोड, राम जाधव, गोपाल चव्हाण, सुनील राठोड, विजय जाधव, लखन राठोड, पंकज चव्हाण, नेमीचंद राठोड, अरुण जाधव, गोपाल राठोड, रामजीवन राठोड आणि डॉ. सुधाकर राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भाऊ नाईक, विशाल राठोड आणि चिंतामण चव्हाण यांनी एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली सविस्तर मते मांडली. समाजातील युवकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच आगामी मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन वक्त्यांनी केले.

सभेत दि. १२ जुलै २०२६ रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य मेळाव्यासाठी मानोरा तालुक्यातून वाहने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले. (ST Reservation Demand) कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन गोपाल चव्हाण यांनी केले, तर सभेचे अध्यक्षस्थान संजय महाराज यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजातील एकता, संघटन आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर एसटी आरक्षणाचा लढा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे आवाहन केले. ही सविचार सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून, संभाजीनगर येथे होणाऱ्या आगामी एसटी आरक्षण मेळाव्यासाठी मानोरा तालुक्यातील गोर बंजारा समाज सज्ज असल्याचे या सभेतून स्पष्ट झाले.

संबंधित सामग्री

हिंगोलीत भारतीय जैन संघटनेची संवाद यात्रा, कुटुंबव्यवस्थेसाठी 10 कलमी कार्यक्रम जाहीर

हिंगोलीत भारतीय जैन संघटनेची संवाद यात्रा, कुटुंबव्यवस्थेसाठी 10 कलमी कार्यक्रम जाहीर

Indian Jain Association: भारतीय जैन संघटनेने कुटुंब व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी 10 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

Aug 20, 2026
अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल कधी? फडणवीसांनी विधानसभेत दिली मोठी माहिती

अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल कधी? फडणवीसांनी विधानसभेत दिली मोठी माहिती

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताच्या तपासाचा अंतिम अहवाल पुढील वर्षी जानेवारीपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे.

Jul 11, 2026
'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर

'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Jul 10, 2026
विधानसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 2026-27 पीक कर्ज परतफेडीची अट रद्द

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 2026-27 पीक कर्ज परतफेडीची अट रद्द

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे.

Jul 10, 2026