कोरची (Farm Loan Waiver Scheme) : राज्य शासनाने जाहीर केलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी त्यातील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे . या जाचकटीमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या सर्व जाचकट्टी तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी (राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्यावतीने 16 जून रोजी कोरची तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकरी सध्या सततची नापीक, अस्मानी, सुलतानी संकटे, आणि शेतीमालास मिळणारे कवडीमोल भाव यामुळे पूर्णपणे आर्थिक कोंडी सापडला आहे अशा अत्यंत बिकट परिस्थितीत शासन कर्ज माफी साठी लादलेल्या अटी म्हणजे शेतकऱ्यांना जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे.
2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना असलेले 50 हजार रुपये कर्ज मर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात यावी एकर कमी परतफेड योजनेअंतर्गत कोणत्याही विलस्ट अटी न घालता शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी लावलेले सलग चार वर्ष नियमित कर्ज फेडीची जाचक अटक त्वरित रद्द करण्यात यावी 2017 च्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्राच्या तांत्रिक त्रुटीमुळे लाभार्थ्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी लाभ देण्यात यावा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज खात्याचे पूर्ण घटन करून नवीन हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गट पक्षाचे कार्याध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली, बालाजी ठाकरे वडसा,कोरचीचे तालुकाध्यक्ष क्रांती केरामी , सुषमा कमरो अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महिला),डॉ .मानिक गाहाणे महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस कोरची,इसराईन कमरो ,मानुराम कुमरे अध्यक्ष आदिवासी आघाडी राॅ.का.कोरची, यामिनी कोराम, राॅ.का सदस्य, कुमारसाय बोगा , चैत्राम कोल्हे, निजामसाम कोल्हे,संतराम मडावी , गांगसाय कल्लो, ओमप्रकाश कारीहरतार, चंद्रसाय कोल्हे, लालसाय पोरेटी,समारू कल्लो , सिद्धार्थ उंदीरवाडे,यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
कर्जमाफीतील योजनेतील जाचक अटी रद्द करून; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
Farm Loan Waiver Scheme: कर्जमाफी योजना मध्ये जाचक अटीच्या कारणाने शेतकर्यांना लाभासाठी संघर्ष होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना त्वरित रद्द करण्याचा मागा केला.
Farm Loan Waiver Scheme
संबंधित सामग्री
कर्जमुक्ती यादीतील रक्कम आणि बँक भरणार त्या रक्कमेच्या याद्या प्रकाशीत करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा: विनायक सरनाईक
Farmer Loan Waiver List: राज्य शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या यादीतील माफीची रक्कम, बँकेच्या नोंदी
बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा
Collector Rahul Gupta: बियाणे जिल्ह्यातील बियाणे कंपन्यांना बोगस बियाणे विक्रित करण्यासाठी कठोर काळ्याशी युक्त करून, शेतकऱ्यांच्या तक्रारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश
तालुक्यात समस्यांचे डोंगर, स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय ‘दौऱ्या’त मग्न!
Armori Taluka problem: आरमोरीच्या गावात पाण्याच्या संकट आणि शेतकऱ्यांना वनपट्टेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय अडचणी असली. कर्जबाजार, धान खरेदी व रोजगारीच्या कमतरत्या
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे कृषी मंत्रीना कारवाईचे पत्र
Farmers Crop Insurance: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांचे पिक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे तात्काळ कारवाई मागितली गेली. परिवर्तन शेतकरी संघटन
अकरा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याची आत्मदहनाची तयारी
Land Records Office: वसमत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अडवणूकामुळे शेतकरी मारोतराव गंगाराम फेगडे यांनी १२ वर्षांपेक्षा जास्त काळाने दलित झाल्याने आत्मदहन