Maharashtra School Education

शाळांच्या मान्यतेचे अधिकार आता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे; शिक्षणमंत्र्यांचे अधिकार झाले हस्तांतरित

राज्यातील शाळांच्या प्रशासकीय प्रक्रियेला अधिक गतिमान करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिकारांच्या पातळीवर महत्त्वाचा बदल केला आहे.

शाळांच्या मान्यतेचे अधिकार आता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे; शिक्षणमंत्र्यांचे अधिकार झाले हस्तांतरित

Maharashtra School Education

दर्जावाढ, नव्या तुकड्या-शाखांना मंजुरी आणि ‘ना हरकत’ प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; प्रशासकीय कामकाजाला मिळणार वेग

पुणे : राज्यातील शाळांच्या प्रशासकीय प्रक्रियेला अधिक गतिमान करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिकारांच्या पातळीवर महत्त्वाचा बदल केला आहे. शाळांना मान्यता देणे, दर्जावाढ करणे, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर नव्या तुकड्या व शाखांना मंजुरी देणे, तसेच विविध शिक्षण मंडळांशी संलग्नतेसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे आणि त्याचे नूतनीकरण करण्याचे अधिकार आता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी या बाबींशी संबंधित अधिकार शिक्षणमंत्र्यांकडे होते.

शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ हे उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत १०० टक्के ई-गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणांना चालना आणि शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने विद्यमान कायदे व नियमांमध्ये आवश्यक बदल करून अधिकारांचे प्रत्यायोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अंतर्गत शाळांच्या व्यवस्थापनाशी संबंधित विविध अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार अस्तित्वातील शाळांची दर्जावाढ करण्यासाठी इरादा पत्र देणे आणि त्यानंतर मान्यता देण्याचे अधिकार शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपवण्यात आले आहेत.

याशिवाय सीबीएसई, सीआयसीएसई, आयबी आणि सीआयई यांसारख्या देशातील तसेच परदेशातील शिक्षण मंडळांशी संलग्न होऊ इच्छिणाऱ्या शाळांना नव्याने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे आणि त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भातील अधिकारही निश्चित करण्यात आले आहेत. स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शाळांना नव्या तुकड्यांना मान्यता देणे तसेच शाखा सुरू करण्यास मंजुरी देण्याचे अधिकार शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळांसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे व त्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी प्रधान सचिवांकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, या आठ महापालिका क्षेत्रांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागांतील शाळांसाठी नव्याने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे, तसेच त्याच्या नूतनीकरणाची कार्यवाही करण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.

अधिकारांचे हे विकेंद्रीकरण झाल्यामुळे शाळांची दर्जावाढ, विविध शिक्षण मंडळांसाठी आवश्यक ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, तसेच स्वयंअर्थसहाय्यित पद्धतीने नव्या तुकड्या किंवा शाखा सुरू करण्याच्या प्रक्रियेत होणारा प्रशासकीय विलंब कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026