मानोरा (Minister Sanjay Rathod) : मुंबई मलबार हिल येथील शिवनेरी शासकीय निवासस्थानी 'वसंत विचारधारा मंच'च्या शिष्टमंडळाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांची आभार आणि धन्यवादपर भेट घेतली. यावेळी वसंत विचारधारा मंच ने मागील ७-८ वर्षापासून केलेल्या प्रदीर्घ संघर्ष आणि पाठपुराव्यानंतर 'जलसंधारणाचे प्रणेते' माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल (Minister Sanjay Rathod) मंत्री संजय राठोड यांचे आभार मानण्यात आले.
भेटीदरम्यान राज्यभर जलसंधारण, जलसाक्षरता आणि 'पाणी आडवा, पाणी जिरवा' या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या पाणी बचतीच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी प्रत्येक शासकीय स्तरावर विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. जलसंधारणाच्या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी शासन व सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी 'वसंत विचारधारा मंच' च्या शिष्टमंडळाने मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
'जलसंधारण दिन' च्या निर्णयाबद्दल जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आभार भेट; जलसंवर्धनावर सकारात्मक चर्चा
Minister Sanjay Rathod: मुंबई मलबार हिल येथील शिवनेरी शासकीय निवासस्थानी 'वसंत विचारधारा मंच'च्या शिष्टमंडळाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांची आभार आणि धन्यवादपर भेट घेतली.
Minister Sanjay Rathod
संबंधित सामग्री
जलसंधारण दूत म्हणून अशासकीय व निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करावी!
Water Conservation Ambassador:
बंजारा विरासत संघातर्फे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम: ना. संजय राठोड
Minister Sanjay Rathod: संजय राठोड यांनी बंजारांचे सर्वांगीण विकासांसाठी नोंदणी करण्याचा आवाहन करून एकता तयार करण्याच्या मागणीतील संकल्पनेत हस्तक्षेप.
सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे!
Water Conservation Campaign: महाराष्ट्र शासनाने नुकताच माजी मुख्यमंत्री तथा 'जलसंधारणाचे प्रणेते' सुधाकररावजी नाईक साहेब यांचा २१ ऑगस्ट हा जयंतीदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय