मंत्री संजय राठोड

बंजारा विरासत संघातर्फे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम: ना. संजय राठोड

Minister Sanjay Rathod: संजय राठोड यांनी बंजारांचे सर्वांगीण विकासांसाठी नोंदणी करण्याचा आवाहन करून एकता तयार करण्याच्या मागणीतील संकल्पनेत हस्तक्षेप.

बंजारा विरासत संघातर्फे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम: ना. संजय राठोड

Sanjay Rathod

 

रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत समस्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार; ना. संजय राठोड यांचे आवाहन 
समाजबांधवांनी नोंदणी करून सहभागी व्हावे!

मानोरा (Minister Sanjay Rathod) : बंजारा समाजाला एकत्र, सक्षम व संघटित करण्यासाठी "बंजारा विरासत संघ" या सामाजिक संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तांड्यातील व परिसरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी संघ शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याने संपूर्ण राज्यातील गोर बंजारा समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे मुख्य संयोजक तथा मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केले आहे. 

 बंजारा विरासत संघाचा मुख्य उद्देश तांड्यातील व परिसरातील रस्ते, पाणी, दवाखाना, स्मशानभूमी, शाळा, वीज, शेतरस्ते, नाला खोलीकरण आदी मूलभूत समस्यांची माहिती गोळा करून त्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.  "बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाला एकत्र येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेत्यांशी समन्वय साधून शासकीय योजना, सुविधांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संघ काम करेल. तसेच सद्यस्थितीतील लोकसंख्या, उपलब्ध शासकीय योजना यांचा तुलनात्मक अभ्यासही केला जाणार आहे."  

संघातर्फे समाजबांधवांची नोंदणी विकसित केलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल करून करता येईल. तसेच संघाने प्रसारीत केलेल्या संकेतस्थळावर किंवा  क्यू आर कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येणार आहे. बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन एकजूट दाखवावी आणि जास्तीत जास्त नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन ना . राठोड करणार केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत इंदल भोला राठोड व डी डी राठोड यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

'जलसंधारण दिन' च्या निर्णयाबद्दल जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आभार भेट; जलसंवर्धनावर सकारात्मक चर्चा

'जलसंधारण दिन' च्या निर्णयाबद्दल जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आभार भेट; जलसंवर्धनावर सकारात्मक चर्चा

Minister Sanjay Rathod: मुंबई मलबार हिल येथील शिवनेरी शासकीय निवासस्थानी 'वसंत विचारधारा मंच'च्या शिष्टमंडळाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांची आभार आणि धन्यवादपर भेट घेतली.

Jul 09, 2026
तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांचा मार्ग मोकळा; मंत्री संजय राठोड यांच्याकडून ग्वाही

तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांचा मार्ग मोकळा; मंत्री संजय राठोड यांच्याकडून ग्वाही

Pohra Devi Pilgrimage: महाराष्ट्राच्या मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीतील बांधकामांमध्ये असलेल्या तक्रारांना समाधान देण्यात आले. संत सेवालाल महाराज मंदिर आणि देवी जगदंबा माता मंदिर

May 27, 2026