महाराष्ट्र आयपीएस नियुक्ती

महाराष्ट्रात 12 परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Maharashtra IPS Appointment: महाराष्ट्र गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 12 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापना जाहीर केल्या आहेत. याबाबतचा शासन आदेश 25 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात

महाराष्ट्रात 12 परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Maharashtra IPS Appointment

 

परभणी, उमरखेड, गडचिरोली, रत्नागिरी सह विविध उपविभागात मिळाली जबाबदारी

हिंगोली (Maharashtra IPS Appointment) : महाराष्ट्र गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 12 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापना जाहीर केल्या आहेत. याबाबतचा शासन आदेश 25 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथील फेज-2 बेसिक कोर्स 74 आरआर चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या अधिकाऱ्यांची महाराष्ट्र संवर्गात 31 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्ती होणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांची उप विभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शासन आदेशानुसार 2023 च्या तुकडीतील अरांक्षा यादव यांची रत्नागिरी, कायांदे पाटील गुरव गंगाधर यांची उमरखेड यवतमाळ, कुमार सुशांत यांची राजुरा चंद्रपूर, मेघना आय. एन. यांची लातूर ग्रामीण, राहुल कुमार यांची परभणी शहर आणि राहुल रमेश आत्राम यांची आर्वी वर्धा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 

तसेच 2024 च्या तुकडीतील सागर संजय भामरे यांची भामरागड गडचिरोली, ईशानी आनंद यांची अचलपूर अमरावती ग्रामीण, जान्हवी बाळासाहेब शेखर यांची गंगापूर छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, सारदा तेजस सुरदीप यांची भंडारा, शशांत एन. एम. यांची कामठी नागपूर ग्रामीण आणि सुयश कुमार सिंग यांची धानोरा गडचिरोली येथे उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 च्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस महासंचालकांनी न्यायालयीन आदेश आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे. हा आदेश शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026