परभणी पाटबंधारे विभाग

परभणीत जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला ठोकले कुलूप...!

Parbhani Irrigation Department: कडक उन्हामुळे शेतकर्‍यांचे पिके सुकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर कुलूप ठोकून वाढीव पाणी सोडण्याची मागणी केली.

परभणीत जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला ठोकले कुलूप...!

Parbhani Irrigation Department

कालव्यात पाणी सोडण्याची मागणी
फुलकळस,ताडकळस व परिसरातील शेतकर्‍यांचे आंदोलन

परभणी (Parbhani Irrigation Department) : संपूर्ण राज्यात  उष्णतेची लाट सुरु आहे. कडक उन्हामुळे  शेतकर्‍यांची पिके सुकून जात आहेत. जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत लोहगाव उपविभागा अंतर्गत ताडकळस शाखा कालव्यात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे  कठीण परिस्थित सापडलेल्या संतप्त शेतकर्‍यांनी शुक्रवार २९ मे रोजी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ च्या कार्यालयास टाळे ठोकून वाढीव पाणी सोडण्याची मागणी केली.

तालुक्यातील लोहगाव उपविभाग ९ अंतर्गत येणार्‍या शाखा क्र. २० व १० ताडकळस क्षेत्र येते. या क्षेत्रात कालव्यामधून मिळणार्‍या पाण्याचा मोठा आधार होतो. मात्र सध्या तापमान ४३ अंशावर गेले आहे. उन्हामुळे या क्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. गुराढोरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक अडचणीत आले आहेत. वारंवार मागणी करुनही कालव्यात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे शुक्रवार २९ मे रोजी फुलकळस, ताडकळस व परिसरातील संतप्त शेतकरी, ग्रामस्थांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर (Parbhani Irrigation Department) हल्ला बोल केला.

शेतकरी भर उन्हात कार्यालयावर पोहचले, मात्र एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी (Parbhani Irrigation Department) कार्यकारी अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनात उप सभापती काशिनाथ काळबांडे, मन्मथ नावकीकर, गजानन शिराळे, शिवधन शिराळे, वचिष्ट मिसाळ, दिनकर कुबडे, बसवेश्वर शिराळे, नागेश नावकीकर, ईश्वर शिराळे,  अविनाश शिराळे, रितेश शिराळे, आदींचा सहभाग होता.

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.

Oct 02, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026