कळमनुरी (Cattle slaughter strict action) : कळमनुरी शहरात गोवंश हत्या करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे तरी शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही जनावराची अवैध कत्तल करू नये, तसे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी बैठकीत दिला आहे. सात जून रोजी पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांचे प्रमुख उपस्थितीत कळमनुरी पोलीस स्टेशन येथे शहरातील कुरेशी / खाटीक समाजाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत समाजातील नागरिकांना गोवंश हत्या न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच (Cattle slaughter strict action) गोमांसाची आयात-निर्यात अथवा विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. यावेळी अवैध प्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. बैठकीस उपस्थित सर्वांनी शासनाने प्रतिबंधक केलेले गोहत्या करणार नसल्याची संमती दर्शवली. सदर बैठकीस कुरेशी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.