आश्रमशाळा विद्यार्थी गणवेश

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवू नका; तातडीने वितरणाची स्वराज्य शिक्षक संघाची मागणी

Ashram School Student Uniform: राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळा

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवू नका; तातडीने वितरणाची स्वराज्य शिक्षक संघाची मागणी

Ashram School Student Uniform

सेनगाव (Ashram School Student Uniform) : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश, शूज व सॉक्सचे वितरण न झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तात्काळ साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी स्वराज्य शिक्षक संघाने केली आहे.

हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेतून सन १९५३ पासून आश्रमशाळा योजना सुरू करण्यात आली. सध्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत १०० टक्के अनुदान तत्त्वावर ९८० आश्रमशाळा चालवल्या जात आहेत. हिंगोली जिल्ह्यात प्राथमिक ८, माध्यमिक ८ आणि उच्च माध्यमिक ४ आश्रमशाळा कार्यरत आहेत. दरम्यान, राज्यात (विदर्भ वगळता) १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून, शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके, शूज व सॉक्सचे वितरण करण्यात आले. मात्र निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप हे साहित्य मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे.

शासन नियमानुसार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके, शूज व सॉक्स देणे बंधनकारक आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये या साहित्याचे वितरण अद्याप झाले नसल्याचा दावा स्वराज्य शिक्षक संघाने केला आहे. याबाबत स्वराज्य शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश जावळे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांना निवेदन देत विद्यार्थ्यांना एक शालेय गणवेश, एक खेळाचा गणवेश, शूज व सॉक्स तात्काळ वितरित करावेत, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
वसतिगृहातील २०० मिली टेट्रा पॅक दुधाचा निर्णय रद्द करा; भीम शक्ती संघटनेची मागणी

वसतिगृहातील २०० मिली टेट्रा पॅक दुधाचा निर्णय रद्द करा; भीम शक्ती संघटनेची मागणी

Bhim Shakti Organization: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा २०० मिली टेट्रा पॅक दुधाचा निर्णय ताबडतोब रद्द करावा

Sep 01, 2026
'भीक नका देऊ, त्यांना स्वावलंबी बनवा!'

'भीक नका देऊ, त्यांना स्वावलंबी बनवा!'

State Food Commission: रस्त्यावर, सिग्नलवार, मंदिरा बाहेर तसेच सार्वजनिक ठिकाणी भिक्षावृत्तीला प्रोत्साहन देऊ नका, असे आवाहन करताना त्या ऐवजी त्यांना पैशाऐवजी गरज असेल तर अन्न द्या

Aug 21, 2026
राज्यातील लिंगायतांना मिळणार 'अमृत'चा लाभ!

राज्यातील लिंगायतांना मिळणार 'अमृत'चा लाभ!

Lingayat Samaj: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत), पुणे या संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास आणि आर्थिक उन्नतीच्या योजनांचा लाभ हिंदू लिंगायत

Aug 21, 2026
लातूरच्या वैशालीनगरातील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड देण्याचे अन्न आयोगाचे निर्देश; अध्यक्ष महेश ढवळे यांची पाहणी

लातूरच्या वैशालीनगरातील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड देण्याचे अन्न आयोगाचे निर्देश; अध्यक्ष महेश ढवळे यांची पाहणी

महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी बाभळगाव येथील वैशाली नगर परिसराला भेट देऊन तेथील स्थलांतरित कुटुंबांच्या अडचणींचा आढावा घेतला.

Aug 06, 2026