गॅससाठी ग्राहकांच्या रांगा

शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेबाबत अनियमितता व अपुऱ्या सुविधांबाबत नागरिकांकडून तक्रारी समोर आल्यानंतर पुरवठा विभागाने २८ मार्च शनिवारी  संबंधित गॅस एजन्सीची पाहणी करून लेखी पंचनामा केला.

गॅससाठी ग्राहकांच्या रांगा

LPG Distribution Issue

एजन्सींना नियमपालनाचे निर्देश

सेनगाव (LPG Distribution Issue) : शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेबाबत अनियमितता व अपुऱ्या सुविधांबाबत नागरिकांकडून तक्रारी समोर आल्यानंतर पुरवठा विभागाने २८ मार्च शनिवारी  संबंधित गॅस एजन्सीची पाहणी करून लेखी पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागत असून, वितरण प्रक्रियेत विलंब होत असल्याची बाब निदर्शनास आली. तसेच प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी  मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात बुकिंग व वितरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे ग्राहकांनी नमूद केले. याशिवाय, गॅस एजन्सीकडून दर्शनी भागात साठा, बुकिंग स्थिती व प्राधान्यक्रम (सिनिऑरिटी) यादी प्रदर्शित करणे बंधनकारक असताना संबंधित नियमांचे पालन होत नसल्याचेही आढळून आले. शहरातील एका गॅसच्या सब-डिलरकडे नियमित पुरवठा न झाल्याने काही दिवसांपासून ग्राहक प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. मुख्य एजन्सी व सब-डिलर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत आहे.

तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे यांनी सांगितले की, संबंधित एजन्सीला ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गॅसची जादा दराने विक्री किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर प्रकरणामुळे गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, प्रशासनाने यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन; ११ ऑगस्टला महावितरणवर भव्य मोर्चा

वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन; ११ ऑगस्टला महावितरणवर भव्य मोर्चा

Electricity Consumers' Association: विजेच्या विविध प्रश्नांवरून ग्राहकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहक संघटनेची चळवळ आता अधिक तीव्र होत असून, याच अनुषंगाने आज हिंगोली

Aug 02, 2026
जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या;  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या;  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

Hingoli Smart Meter: हिंगोली जिल्ह्यात स्मार्ट मीटरची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वीज बिलाबाबतच्या तक्रारी कमी झाली आहेत. पारंपरिक मीटरच्या स्थानापासून डिजिटल मीटर

May 25, 2026
गोरेगावात डिझेलसाठी किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावर वादावादी

गोरेगावात डिझेलसाठी किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावर वादावादी

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल मिळविण्यासाठी लागलेल्या रांगेत किरकोळ कारणावरून वादावादी होऊन भांडणतंट्याची घटना घडली.

May 23, 2026
हत्ता–तळणी मार्गाचे काम वेगात; पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वाचे उद्दिष्ट

हत्ता–तळणी मार्गाचे काम वेगात; पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वाचे उद्दिष्ट

सेनगाव तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा हत्ता ते तळणी या मार्गाच्या कामाला आता वेग आला असून, पावसाळ्यापूर्वी बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबंधित कंपनीने ठेवले आहे.

May 18, 2026
आ. समीर मेघे यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस; कार्यवाहीचे आश्वासन

आ. समीर मेघे यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस; कार्यवाहीचे आश्वासन

हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला.

May 16, 2026