आ. समीर मेघे यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस; कार्यवाहीचे आश्वासन

हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला.

आ. समीर मेघे यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस; कार्यवाहीचे आश्वासन

Janata Darbar

नागपूर (Janata Darbar) : हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला. या दरबारात विविध समस्यांचा पाऊस पडत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अमजद शेख, नगरसेवक सन्नी चौहान, नगरसेविका जयश्री विनोद पाटील, करिश्मा संजय भुमरकर तसेच आई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सदस्य आयफाज शेख, शुभम कैकाडी आदींनी जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

जनता दरबारात प्रभागातील रस्ते, नाली, स्वच्छता यांसाठी निधी उपलब्ध करून देणे, रेल्वे अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन, अंडरपास किंवा अंडरब्रिजची उभारणी, हनुमान नगरमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देणे, नियमित पाणीपुरवठा करणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच आवश्यक ठिकाणी डीपी बसविणे, गॅस सिलेंडरचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आमदार समीर मेघे यांनी नागरिकांच्या सर्व समस्या ऐकून त्यावर सकारात्मक कार्यवाही करून न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या जनसंपर्क आणि समस्यांप्रती असलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित सामग्री

धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली; परळीतील रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर

धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली; परळीतील रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर

परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची जनता दरबारादरम्यान अचानक प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

Sep 15, 2026
मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला. ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि भारत-ब्रिटन संबंधांवर त्यांनी भाष्य केले.

Sep 10, 2026
दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे भडगावातील यशवंत नगर गणपती मंदिर परिसर जलमय; नागरिकांना मोठा त्रास

दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे भडगावातील यशवंत नगर गणपती मंदिर परिसर जलमय; नागरिकांना मोठा त्रास

 गेल्या दोन दिवसांपासून भडगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले.

Jul 31, 2026
चिखलीत ३ ऑगस्टला भव्य 'समाधान शिबिर'; आमदार श्वेता महाले पाटील यांचे नागरिकांना आवाहन

चिखलीत ३ ऑगस्टला भव्य 'समाधान शिबिर'; आमदार श्वेता महाले पाटील यांचे नागरिकांना आवाहन

Chikhali Samadhan Shibir: शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर

Jul 29, 2026