निकतवाडा येथे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

घोट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निकतवाडा येथे सध्या प्रचंड उष्णतेच्या दिवसांत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना दिवसरात्र मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

निकतवाडा येथे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

Low Voltage Problem

नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

घोट (Low Voltage Problem) : घोट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निकतवाडा येथे सध्या प्रचंड उष्णतेच्या दिवसांत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना दिवसरात्र मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सिंगल फेज व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पंखे, कुलर तसेच पाण्याच्या मोटारी यांसारखी विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापरातील उपकरणे वारंवार बंद पडत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक गंभीर बनत असून, मोटारी सुरू होत नसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे.

निकतवाडा परिसरात वाढती लोकसंख्या व वाढलेला वीज वापर लक्षात घेता विद्यमान ट्रान्सफार्मर अपुरा पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध करून कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित सामग्री

वीज खांबावरील कामासाठी खासगी व्यक्तींना लावल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

वीज खांबावरील कामासाठी खासगी व्यक्तींना लावल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Mahavitaran's strict circular: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत वितरण यंत्रणेच्या कामांबाबत अत्यंत गंभीर परिपत्रक काढले आहे. विद्युत वाहिन्या आणि उपकरणांवर अनधिकृत, खासगी व्यक्तीं..

Sep 27, 2026
हिंगोलीत महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिक आक्रमक

हिंगोलीत महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिक आक्रमक

Hingoli Mahavitaran: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित आणि धोकादायक वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर २२ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयावर भेट दिली.

Sep 23, 2026
वीज प्रश्नी महावितरणच्या कर्मचार्‍यांना ग्रामस्थांनी डांबले; पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले

वीज प्रश्नी महावितरणच्या कर्मचार्‍यांना ग्रामस्थांनी डांबले; पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले

Mahavitaran Case: हिंगोली तालुक्यातील खडकद येथील  ३३  व ११ के व्ही उपकेंद्र अंतर्गत गावांचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे धरणग्रस्त भागातील शेतकर्‍यांनी महावितरण

Sep 16, 2026
वीज बिल थकलं तर कर्मचारी घरी येणार नाही; थेट सर्व्हरवरून लाईट कट!

वीज बिल थकलं तर कर्मचारी घरी येणार नाही; थेट सर्व्हरवरून लाईट कट!

महावितरणच्या नव्या डिजिटल प्रणालीद्वारे थकीत वीज बिलावर मुख्य सर्व्हरमधून वीजपुरवठा स्वयंचलितपणे बंद केला जाणार आहे. थकीत रक्कम भरल्यानंतर ३० मिनिटांत वीज सुरू होईल.

Sep 15, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाण्यात पावसाअभावी खरीप पिके संकटात; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह दिवसा वीजपुरवठा व नादुरुस्त डीपी बदलण्याची शंतनु बोंद्रे यांची मागणी.

Sep 10, 2026