कोरची जनावरांची तस्करी

रात्रीच्या अंधारात ५०-६० जनावरांची तस्करी; ट्रक बंद पडल्याने उघडकीस

Korachi Livestock smuggling:कोडगुल पोलिस स्टेशन हद्दीतील आंलोडी व कोसमी क्रमांक २ परिसरातून जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करून ती कोरची पोलिस स्टेशन हद्दीतून परराज्यात नेली जात असल्याचा गंभीर

रात्रीच्या अंधारात ५०-६० जनावरांची तस्करी; ट्रक बंद पडल्याने उघडकीस

Korachi Livestock smuggling

 

पांढरीगोटा परिसरातील धक्कादायक प्रकार;
काही जनावरे मृत, चार जनावरे जिवंत आढळल्याची पोलिस नोंद

कोरची (Korachi Livestock smuggling) : कोडगुल पोलिस स्टेशन हद्दीतील आंलोडी व कोसमी क्रमांक २ परिसरातून जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करून ती कोरची पोलिस स्टेशन हद्दीतून परराज्यात नेली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पांढरीगोटा परिसरात रात्रीच्या सुमारास जनावरे घेऊन जाणारा बारा चाकी ट्रक (क्र. TG-12-U-4898) रस्त्यात बंद पडल्याने हा प्रकार उघडकीस आला. ट्रकमध्ये मोठ्या संख्येने जनावरे कोंबण्यात आल्याची माहिती असून, ट्रक बंद पडल्यानंतर तस्करांनी जनावरे खाली करून नेल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार घटनास्थळी काही जनावरे जिवंत तर काही मृत अवस्थेत आढळली. घटनेप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कागदपत्रात जप्त मुद्देमालामध्ये जनावरे आणि ट्रकचा समावेश असल्याचे नमूद आहे.

रात्रभर जनावरे हलविल्याचा आरोप

स्थानिकांच्या माहितीनुसार, ट्रक बंद पडल्याची संधी साधून तस्करांनी रात्रीच्या अंधारात ट्रकमधील जनावरे खाली करून अन्यत्र हलविल्याचा आरोप आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिस पोहोचेपर्यंत मोठ्या संख्येने जनावरे तेथून हटविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यामुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. त्यानंतर संबंधित यंत्रणेला रस्त्यावरील अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत करावी लागली.

कोडगुल हद्दीतून रोजच वाहतूक?

आंलोडी व कोसमी क्रमांक २ परिसरातून रात्रीच्या वेळी जनावरांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दररोज एक-दोन वाहनांमधून जनावरे नेली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, ही वाहतूक कोडगुल आणि कोरची पोलिस स्टेशन हद्दीतून पुढे जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्थानिक पोलिसांना ही वाहतूक दिसत नाही का? असा सवाल नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी, तरी कारवाईची प्रतीक्षा

जनावरांच्या कथित तस्करीबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती देण्यात आल्याचा दावा प्राणीप्रेमींकडून केला जात आहे. मात्र, त्यानंतरही या मार्गावरून वाहतूक सुरूच असल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील गांजाची लागवड पोलिसांच्या निदर्शनास येते; मग पोलिस स्टेशनच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी जनावरांनी भरलेली वाहने जात असताना ती का दिसत नाहीत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनंतरही तस्करीचा आरोप

राज्यात गोतस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारकडून दिल्या जात असताना गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात जनावरे कुठून आणली, कुठे नेण्यात येत होती, ट्रकचा मालक कोण, तस्करीमागे कोणाचे नेटवर्क आहे आणि स्थानिक पातळीवर कोणाची मदत मिळत होती, याचा तपास करण्याची मागणी होत आहे. कोडगुल पोलिस स्टेशन हद्दीतील आंलोडी व कोसमी क्रमांक २ परिसरातून सुरू असलेल्या कथित जनावरांच्या वाहतुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी प्राणीप्रेमी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टैग्स: Livestock smuggling

संबंधित सामग्री

कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्थागुशा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई

कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्थागुशा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई

Illegal Cattle Transport: पोलिसांनी अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ११ गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली

Aug 10, 2026
परभणीत गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरे पळविणारी टोळी सक्रिय

परभणीत गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरे पळविणारी टोळी सक्रिय

Parbhani cow-riding gang: गंगाखेड शहरात गाईंना गुंगीचा इंजेक्शन देत इनोव्हा कारमध्ये जनावरांना पळविणारी टोळी सक्रिय झाली. चार दिवसात दोन घटनेत गाईंना बेशुद्ध

May 20, 2026