लातूर वॉक फॉर वॉटर

'वॉक फॉर वॉटर’मध्ये लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग!

Latur Walk for Water:

'वॉक फॉर वॉटर’मध्ये लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग!

Latur Walk for Water

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा जागर

लातूर (Latur Walk for Water) : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने शुक्रवारी जलसंधारण दिनानिमित्त लातूर येथे ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमात लातूर जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती, तर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य होते.

याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जि. प. बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या वर्षापासून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद प्रांगणापासून सुरू झालेली ही महा वॉकेथॉन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत पार पडल्यानंतर तिचा समारोप झाला.

लातूर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे वेगाने होत असून पूर्वीपेक्षा परिस्थिती सुधारत आहे. सध्या एल निनोचे संकट असून भविष्यातही अशी संकटे येऊ शकतात. त्यामुळे 
पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे आणि भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने सर्वांनी पुढे येऊन मृद व जलसंधारणात आपला वाटा उचलावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन किलोमीटरची वॉकेथॉन पूर्ण केली.

प्रभाकर शिवानंद परीट यांना २५ हजारांचे प्रथम बक्षीस

वॉकेथॉनचा समारोप झाल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. या (Latur Walk for Water) कार्यक्रमात ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे पथक विशेष लक्षवेधी ठरले, त्यांनी छत्रीच्या साहाय्याने विविध संदेश रेखाटत ‘सेव्ह वॉटर, सेव्ह सॉईल’चा प्रसार केला. महा वॉकेथॉनमध्ये जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रभाकर शिवानंद परीट याने, १५ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस श्याम जगन्नाथ माने याने, तर १० हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस शेख सरफराज गफार याने पटकावले. यासोबतच लकी ड्रॉ (ईश्वर चिठ्ठी) द्वारे ७ सहभाग्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026