खामगावात खून प्रकरणातील आरोपींची धिंड; घटनास्थळी प्रात्यक्षिक देत उलगडला घटनाक्रम

पोलिसांनी आरोपींकडून प्रत्यक्ष घटनाक्रम समजून घेतला.

खामगावात खून प्रकरणातील आरोपींची धिंड; घटनास्थळी प्रात्यक्षिक देत उलगडला घटनाक्रम

Khamgaon Crime

खामगाव (Khamgaon Crime) : २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी व दगडाने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गंभीर खून प्रकरणाच्या तपासाला वेग देत पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी नेऊन महत्त्वपूर्ण तपास प्रक्रिया पार पाडली.

या वेळी पोलिसांनी आरोपींकडून प्रत्यक्ष घटनाक्रम समजून घेतला. आरोपींनी गुन्हा कसा केला, कोणत्या ठिकाणी काय घडले आणि घटनाक्रम कसा घडत गेला, याचे सविस्तर प्रात्यक्षिक घटनास्थळी करून दाखवले. या पुनर्रचनेतून तपास अधिक स्पष्ट करण्यास मदत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपींना घटनास्थळी आणल्याची माहिती परिसरात पसरताच बर्डे प्लॉट परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. आरोपींना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

या घटनास्थळ प्रात्यक्षिक तपासामुळे खून प्रकरणातील अनेक महत्त्वाचे पैलू स्पष्ट होण्यास मदत होणार असून, तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, लवकरच अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026