Kavadyatra

हर हर महादेवच्या जयघोषाने कन्हान शहर दुमदुमले; भव्य कावडयात्रेत शिवभक्तांचा जल्लोष

जय महाकाल, श्रीराम व हनुमानाच्या मूर्ती ठरल्या आकर्षणाचे केंद्र

हर हर महादेवच्या जयघोषाने कन्हान शहर दुमदुमले; भव्य कावडयात्रेत शिवभक्तांचा जल्लोष

Kavadyatra

महाकाली घाटावरून पवित्र जल भरून कावड यात्रेला सुरुवात

कन्हान : श्रावण महिन्याच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शिवशक्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळ, कन्हान यांच्या वतीने भव्य कावडयात्रा, मंगल कलश यात्रा व शिवजलाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. “हर हर महादेव”, “बम बम भोले”, “जय महाकाल”च्या जयघोषाने संपूर्ण कन्हान शहर दुमदुमून गेले.

महाकाली घाट परिसरातील कन्हान नदीच्या पावन पात्रातून शिवभक्तांनी पवित्र जल कावडीत भरून घेतले आणि त्यानंतर भव्य कावड यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक श्रद्धा, भगव्या पताका, मंगल कलश आणि हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. कावड यात्रेतील जय महाकाल, प्रभू श्रीरामाची मूर्ती, हनुमानजींची मूर्ती आणि नंदीची प्रतिकृती विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. या धार्मिक प्रतिकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

भक्तिगीतांच्या तालावर तरुणाईसह महिला व भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वातावरणात भक्ती आणि उत्साहाची लहर निर्माण केली. महाकाली घाट येथून सुरू झालेली ही कावड यात्रा महामार्गाने गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा चौक, नाका नं. ७ यांसह विविध मार्गाने भ्रमण करून जुने शिवपंचायत हनुमान मंदिर, गांधी चौक येथे पोहोचली.

यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक व राजकीय संस्थांच्या वतीने कावड यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच फ्रूटी, पाण्याच्या बाटल्या व अल्पोपहाराचे वितरण करून शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मार्गावर भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.

कावड यात्रेतील पालखीचेही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भाविकांनी पालखीचे दर्शन घेत श्रद्धापूर्वक नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. पालखीचे आगमन होताच हर हर महादेव, जय श्रीराम, जय हनुमानच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

कावडयात्रेत तरुणांसह महिला भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत लाभ घेतला. “महाकाल”, “जय श्रीराम” यांसह विविध भक्तिगीतांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. भक्तिरसात तल्लीन झालेले शिवभक्त जयघोष करत, नाचत-गात यात्रेत सहभागी झाले.

यात्रेच्या समारोपानंतर शिवपंचायत हनुमान मंदिर परिसरात भगवान शिवशंकराच्या पिंडीवर कन्हान नदीतून आणलेल्या पवित्र जलाने विधिवत शिवजलाभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चार, घंटानाद आणि हर हर महादेवच्या जयघोषात पार पडलेल्या या अभिषेक सोहळ्याने वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले. त्यानंतर उपस्थित शिवभक्तांना महाप्रसाद वितरित करून भक्तीमय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन मीना कळंबे आणि सुरेश कळंबे यांनी केले. श्रावण महिन्यात भक्ती, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही भव्य कावडयात्रा कन्हानकरांसाठी अविस्मरणीय ठरली. दिवसभर कन्हान नगरीत हर हर महादेव, बम बम भोले, जय महाकालचा जयघोष घुमत राहिला आणि संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

कावडयात्रेत वरिष्ठ नागरिक भरत सावळे, नारायण गजभिये, माजी मंत्री राजेंद्र मुळक, वरिष्ठ समाजसेवक नरेश बर्वे, सुत्तम मस्के, कैप्टन सतीश बेलसरे, शैलेश शेळक, अजय लोंढे, विनोद यादव, लोकेश दमाहे, ऋषभ बावनकर, बालचंद बोंदरे, मनोज यादव, लालेश पाली, वर्षा लोंढे, संगीता खोब्रागडे, ज्योती कळंबे, काजल चकोले, अनिता मिलसे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

भव्य कावड यात्रेच्या यशस्वितेकरिता शिवशक्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या शहर प्रमुख मीना कळंबे, सुरेश कळंबे, शुभम बावनकर, सुमित कळंबे, आर्यन कळंबे, सोम कळंबे, आयुष संतापे, भगवान सरोदे, सुजल यादव, गोलु यादव, बंटी यादव, ओम यादव, शिव यादव, अमन यादव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शिवभक्तांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026