काँग्रेस अभय साळुंके

खोटे आरोप करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने आता देशाची माफी मागावी!

Congress Abhay Salunkhe: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लातूर जिल्हाधिकारी अभय साळुंके यांनी भाजपांना खोटे आरोपांच्या बाबतीत देशाची माफी मागावी म्हणून मागणी केली आहे.

खोटे आरोप करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने आता देशाची माफी मागावी!

Congress Abhay Salunkhe

 

काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांची मागणी

लातूर (Congress Abhay Salunkhe) : बोफोर्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यासारखे खोटे आरोप करून भाजपने देशाची दिशाभूल केली आणि सत्ता मिळवली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांतून काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांची निर्दोष मुक्तता केल्याने सत्याचा अखेर विजय झाला आहे. देशाची दिशाभूल करणारे अण्णा हजारे, सुब्रमण्यम स्वामी, रामदेव बाबा यांच्यासह भाजपने आता देशाची जाहीर माफी मागावी, अशी घणाघाती मागणी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी केली.

देशातील ताज्या राजकीय आणि न्यायालयीन घडामोडींवर आपली सविस्तर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. अभय साळुंके म्हणाले की, "आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी आनंदाचा आहे. एकेकाळी बोफोर्सच्या नावावर देशात सत्तापरिवर्तन घडवून आणले गेले, मात्र २००५ साली दिल्ली उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. भारताच्या संगणक क्रांतीचे जनक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार राजीव गांधी यांच्यावर केलेले हे आरोप पूर्णपणे खोटे निघाले."

तसेच, गेल्या १२ वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात कोळसा घोटाळा आणि टू-जी स्पेक्ट्रम (ज्यात १२ लाख कोटी, ५ लाख कोटींचे आकडे सांगण्यात आले) असे आरोप करून देशाचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक क्रांतीचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांची बदनामी करण्यात आली. मात्र, नुकत्याच लागलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. मनमोहन सिंग यांची निर्दोष मुक्तता केली आहे, याकडे (Congress Abhay Salunkhe) साळुंके यांनी लक्ष वेधले.

काँग्रेस नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर कडाडून टीका करताना साळुंके म्हणाले, "अण्णा हजारे, सुब्रमण्यम स्वामी, रामदेव बाबा आणि भाजपच्या नेत्यांनी ट्रकभर पुरावे असल्याचा दावा करत जे थोतांड माजवले, ते आता उघडे पडले आहे. ज्या नेत्यांनी देशात संगणक, इंटरनेट आणि आर्थिक क्रांती आणली, त्यांनाच बदनाम करणाऱ्या या लोकांना आता लाज वाटली पाहिजे. जर त्यांच्यात थोडीही नैतिकता उरली असेल, तर त्यांनी देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे', असेही (Congress Abhay Salunkhe) साळुंके म्हणाले.

साळुंके (Congress Abhay Salunkhe) यांनी आपल्या प्रतिक्रियेत देशाच्या उभारणीतील काँग्रेस नेत्यांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, "हा देश महात्मा गांधीजींच्या विचारांनी स्वतंत्र झाला, पंडित नेहरूंनी तो घडवला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तो उभा आहे. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि अगदी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांचेही या देशासाठी योगदान आहे. मात्र, सध्याचे खोटे आरोप करणारे लोक केवळ जाती-धर्मात तेढ निर्माण करून देश लुटण्याचे काम करत आहेत."

तरुणांनी व नागरिकांनी सावध व्हावे...
देश घडवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या आणि महापुरुषांच्या विचारधारेवर ठाम राहण्याचे आवाहन करत साळुंके यांनी, "देशातील तरुणांनी आणि नागरिकांनी सावध होऊन, ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाचा विकास केला त्या काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांचे हात मजबूत करावेत," अशी साद घातली.

संबंधित सामग्री

कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

Kavad Yatra: देशातील युवा वर्ग संस्कृती पासून दूर जात असल्याच्या तक्रारी होत असताना हिंगोली कळमनुरीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. कावड यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या या युवकांची श्रद्धा व जल्लोष

Aug 24, 2026
'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही प्रशासन बेपत्ता; अखेर तुर्तास आत्मदहन आंदोलन मागे!

पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही प्रशासन बेपत्ता; अखेर तुर्तास आत्मदहन आंदोलन मागे!

Manora Immolation Protest: तालुक्यातील मौजे भुली येथील शेकडो नागरिक सन २०२३ पासून अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत , पात्र कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषीविरुद्ध कार्यवाही करावी,

Aug 16, 2026
भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

Aug 13, 2026