Bridge Damage

भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Bridge Damage

२० लाख ७० हजार २२३ रुपये खर्चून २०२१ मध्ये उभारलेला पूलवजा बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेला; दोनदा दुरुस्ती करूनही काम निष्फळ

कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे जलसंधारण विभागाच्या कामाच्या दर्जाबरोबरच देखभाल आणि दोष निवारणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोरची तालुका हा अतिदुर्गम, अतिसंवेदनशील, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला आहे. अशा भागातील नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील हा पूलवजा बंधारा २०२१ मध्ये २० लाख ७० हजार २२३ रुपये खर्चून बांधण्यात आला होता.

जिल्हा संधारण अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली तसेच उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद (लपा) उपविभाग कुरखेडा यांच्या अंतर्गत हे काम करण्यात आले. या बांधकामाची जबाबदारी गोंदिया येथील मे. सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली होती.

मात्र, बांधकामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले जात असून, या पूलवजा बंधाऱ्याची दोन वेळा दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही यावर्षीच्या पहिल्याच पावसात हा बंधारा वाहून गेल्याने संबंधित विभागाच्या कामकाजावर तसेच दुरुस्तीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूलवजा बंधारा वाहून गेल्यामुळे कोरची मुख्यालयाकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि परिसरातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या मार्गावरून थेट ये-जा करणे शक्य नसल्याने नागरिकांना फेरा मारून कोरची मुख्यालय गाठावे लागत आहे. परिसरात पर्यायी पक्का मार्ग उपलब्ध नसल्याने दैनंदिन वाहतुकीसह विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या ये-जा करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, कोरची तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले दोन पूल अल्पावधीतच खचल्याचे वास्तव समोर आल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिदुर्गम कोरची तालुक्यात भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याची चर्चा होत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्या भूमिकेबाबतही जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पूलवजा बंधारा वाहून गेल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची तातडीने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच सहपालकमंत्री ना. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026