परभणीत अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका कारसह एकूण ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परभणीत अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Illegal Liquor

एसपी पथकाची कारवाई; कारसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी (Illegal Liquor) : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाथरी रोडवरील इंदेवाडी फाटा येथे सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका कारसह एकूण ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार, १६ मे रोजी रात्री करण्यात आली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाला माहिती मिळाली होती की, एमएच ०४ ईएच ६७७८ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक केली जात आहे. त्यानुसार पथकाने इंदेवाडी फाटा परिसरात सापळा रचत संबंधित वाहन अडविले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार तसेच ९६ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. यामध्ये २५ सिल्व्हर बॉक्स तसेच प्रत्येकी १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी मंडला वसंत कुमार (रा. कोटमवाडी, ता. जि. परभणी) व गधा गोनी परसुराम गौड (रा. सिध्दीपेठ, हैदराबाद; हमु. पोखर्णी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दैठणा पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि टर्फे, पोह कुकडे, पोह सय्यद इर्शाद, पोह ताटी कोंडलवार, पोह वाघमारे, पोह चुडवाकर, पोशी शेख, पोशी लिंबाजी वाव्हळे यांच्या पथकाने केली.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026