पोलिस पाटील निलंबित

कळमनुरी उपविभागातील तीन पोलीस पाटील तीन महिन्यांसाठी निलंबित

Police Patil suspended: गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती जाणीवपूर्वक लपवून पोलीस प्रशासनाला सहकार्य न करणे आणि कर्तव्यात कसूर करणे तीन पोलीस पाटलांना चांगलेच महागात

कळमनुरी उपविभागातील तीन पोलीस पाटील तीन महिन्यांसाठी निलंबित

Police Patil suspended

अवैध धंद्यांना पाठीशी घालणे पडले महागात

आखाडा बाळापूर (Police Patil suspended) : गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती जाणीवपूर्वक लपवून पोलीस प्रशासनाला सहकार्य न करणे आणि कर्तव्यात कसूर करणे तीन पोलीस पाटलांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी कळमनुरी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने कठोर पाऊल उचलत उपविभागातील तीन पोलीस पाटलांना थेट तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी प्रतिक्षा भुते यांनी ३१ ऑगस्ट रोजी या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली शहर यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार पोलीस पाटील हे गावपातळीवर पोलीस प्रशासनाचा कणा मानले जातात. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गावात सुरू असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अवैध आणि बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र संबंधित पोलीस पाटलांनी आपल्या गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती देणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आणि निष्काळजीपणा केल्याचे चौकशीत समोर आले.

या गंभीर बाबीची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी, कळमनुरी यांनी  धानोरा जहागीरचे पोलीस पाटील विश्वनाथ देवबाराव जाधव, कोंढूरचे पोलीस पाटील तथा चिंचोर्डीचा अतिरिक्त पदभार असलेले पांडुरंग दादाराव भुरके आणि वाकोडीचे पोलीस पाटील भागवत दत्तराव करडखेले यांना पोलीस पाटील पदावरून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे.

या कारवाईमुळे पोलीस पाटील वर्तुळात एकच खळबळ उडाली असून जे (Police Patil suspended) पोलीस पाटील आपल्या कर्तव्यात हयगय करतील किंवा अवैध धंद्यांना अभय देतील त्यांची गय केली जाणार नाही असा कडक संदेशच प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे. पोलिस पाटलांवर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याने अनेकांच्या छातीचे ठोकेही वाढले आहेत.

यापुर्वी बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेचे निलंबन 
हिंगोली : शहराजवळील अकोला बायपास ते गारमाळ रस्त्यालगत अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने टाईम बाजार मटका जुगारावर ३१ जुलैला छापा मारला होता. या भागातील महिला पोलिस पाटील श्रीमती रत्नमाला दिनकर शिखरे यांच्या कार्यक्षेत्रात जुगार सुरू असताना त्याची माहिती पोलिसांना न दिल्याने हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी पाठवलेल्या अहवालावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी रत्नमाला शिखरे यांचे १ महिन्यासाठी निलंबन केले होते.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026
वाहनावर दंड आकारल्याच्या कारणातून शहर वाहतुक शाखेच्या पोलिसाला मारहाण

वाहनावर दंड आकारल्याच्या कारणातून शहर वाहतुक शाखेच्या पोलिसाला मारहाण

Hingoli police assault case: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला गाडीवर दंड आकारल्याच्या रागातून लोखंडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Sep 22, 2026
हिंगोलीतील पोलिस वसाहतीची  सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी

हिंगोलीतील पोलिस वसाहतीची  सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी

Hingoli Police Colony Burglary: पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चोर्‍यांचे सत्र सुरुच ठेवले आहे. शहरातील  नवीन पोलिस वसाहतीमधील पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी २ लाख ९४ हजार रुपयाचा ऐवज

Sep 15, 2026
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात 'जॅक'चे आगमन

हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात 'जॅक'चे आगमन

Hingoli Police Force: जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. बॉम्ब व स्फोटक शोधक श्वान पथकात नव्याने दाखल झालेल्या श्वानाचे नामकरण

Sep 15, 2026