शिक्षक न्यायहक्क आंदोलन

शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी आज जिल्हाभर शाळा बंद; ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

Teacher Justice Movement: हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयेवर शाळा बंद मागण्याच्या आंदोलनासाठी धरण देण्यासाठी शिक्षकांचे सक्रिय सहभाग झाले.

शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी आज जिल्हाभर शाळा बंद; ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

Teacher Justice Movement

हिंगोली (Teacher Justice Movement) : शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण, टीईटीची सक्ती, बीएलओ व एसआयआरसारख्या अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवार ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन होत आहे. या आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी सक्रिय सहभाग जाहीर केला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद ठेवून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, टीईटीची सक्ती रद्द करणे, बीएलओ व एसआयआरसारख्या अतिरिक्त कामांतून शिक्षकांची मुक्तता, जुनी पेन्शन योजना लागू करणे, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देणे, २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करणे, आठवा वेतन आयोग लागू करणे यासह विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत सर्व संघटनांनी एकमुखाने शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सर्व शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलनात शंभर टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस व्ही. डी. देशमुख, सुभाष जिरवणकर, दत्ता पडोळे, विजय राठोड, गजानन बोरकर, किरण राठोड, रमेश क्षिरसागर, सचिन गायकवाड, रमेश खंदारे, यशवंते सर, हरिभाऊ मुटकुळे, पंडित नागरगोजे, डी. जी. शिंदे, रमेश जाधव, भगवान माखणे, श्रीराम महाजन, मधुकर गडदे, माधव वायचाळ आदींसह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनांकडून व्यापक तयारी करण्यात आली असून, शिक्षकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Sep 15, 2026