शेतकऱ्यांनो एकत्र या;तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्यापासून आरपारची लढाई छेडण्याचा एल्गार पुकारला आहे.

शेतकऱ्यांनो एकत्र या;तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

Hunger Strike

ही कर्जमाफी नसून फक्त आकड्यांचा खेळ; जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा आकडा जाहीर करण्याची मागणी

चिखली (Hunger Strike) : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्यापासून "आरपारची लढाई" छेडण्याचा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

रविकांत तुपकर हे रविवार, दि. 14 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. ही लढाई केवळ एका नेत्याची नसून महाराष्ट्रातील प्रत्येक कर्जबाजारी आणि पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याची असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी खताचा तुटवडा, कर्जमाफीबाबतचा गोंधळ आणि हक्काचा पीकविमा न मिळणे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. शासन एका बाजूला नुकसानभरपाई देऊन पिकांचे नुकसान मान्य करते, मात्र दुसऱ्या बाजूला कठोर अटी घालून पीकविमा नाकारते, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“रविकांत तुपकर यांनी सुरू केलेली ही आरपारची लढाई यशस्वी करायची असेल आणि शासनाकडून सरसकट कर्जमुक्ती व हक्काचा पीकविमा मिळवून घ्यायचा असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले.

ही कर्जमाफी नसून नुसताच आकड्यांचा खेळ – विनायक सरनाईक

“शासनाने यापूर्वी दोन वेळा कर्जमाफी केली. त्यावेळी कोणता शेतकरी कर्जमाफीस पात्र आहे, हे शेतकऱ्यांना स्पष्टपणे माहिती होते. मात्र, यावेळी कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, याबाबत शेतकऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही. बँकादेखील याबाबत माहिती देत नसल्याने त्यांनासुद्धा नेमक्या किती शेतकऱ्यांना लाभ मिळेल, हे माहीत नाही.

असे असताना ‘36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली’ आणि ‘65 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल’ अशी घोषणा सरकारकडून केली जात आहे. जर बँकांकडून व जिल्हा प्रशासनाकडून नेमके किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत हे निश्चित झालेले नसेल, तर तातडीने खालील माहिती जाहीर करावी :

  1. प्रोत्साहन अनुदानात किती शेतकरी पात्र ठरले?
  2. किती शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ मिळणार?
  3. किती शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार?
  4. OTS योजनेत किती शेतकरी बसणार?

या सर्व बाबींची सविस्तर यादी प्रसिद्ध करून प्रशासनाने जिल्ह्याचा संपूर्ण आकडा जाहीर करावा,” अशी मागणी विनायक सरनाईक यांनी केली आहे.

“कोणाला किती लाभ मिळणार हे निश्चित नसताना केवळ कोट्यवधींची आकडेवारी जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. हा फक्त आकड्यांचा खेळ असून ही कर्जमाफी नसून अप्रत्यक्षपणे कर्जवसुलीच आहे,” असा घणाघाती आरोपही सरनाईक यांनी केला.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
हळद पिकाचा ‘ट्रिगर’ लागू करून हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा द्या!

हळद पिकाचा ‘ट्रिगर’ लागू करून हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा द्या!

Vinayak Sarnaik: खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दीर्घ खंड दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हळद पिकासाठी लागू असलेल्या हवामान धोक्याच्या निकषांचा व शासन निर्णय

Oct 02, 2026
आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

Tehsildar office Hunger strike: आखाडा बाळापूर तालुका निर्मिती अप्पर तालुका घोषित करा या मागणीसाठी २ आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर तालुका कृती समितीच्या वती

Oct 02, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026