भगवान परशुराम परिक्रमा

भगवान परशुराम परिक्रमेचे हिंगोलीत उत्साहात स्वागत

Lord Parashurama Parikrama: हिंगोलीत भगवान परशुराम परिक्रमेला उत्साहात स्वागत. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील विविध ब्राह्मण समाज संघटनांच्या संयुक्त आयोजनात या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले.

भगवान परशुराम परिक्रमेचे हिंगोलीत उत्साहात स्वागत

Lord Parashurama Parikrama

हिंगोली (Lord Parashurama Parikrama) : अहिल्यानगर येथून प्रारंभ होऊन मध्य प्रदेशातील जानापावपर्यंत जाणाऱ्या भगवान परशुराम परिक्रमेचे (Lord Parashurama Parikrama) हिंगोली जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले. या परिक्रमेचे स्वागत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने करण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. अहिल्यानगर येथील श्री चिरंजीव प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील विविध ब्राह्मण समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांसाठी राज्य शासनाची स्वायत्त संस्था म्हणून अमृत कार्यरत आहे. या संस्थेमार्फत विविध विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. या प्रसंगी अमृत संस्थेचे हिंगोली जिल्हा उपव्यवस्थापक संजय मेथेकर यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थितांनीही मोठ्या श्रद्धेने पूजनात सहभाग घेतला. कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी व ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत संस्थेच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे, उपव्यवस्थापक संजय मेथेकर तसेच लक्षित गटातील विविध संघटनांच्या अध्यक्षांनी (Lord Parashurama Parikrama) परिक्रमा मंडळाचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थी व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026