हिंगोली तरुण मृत्यू

जपानमधील कुरे शहरात पोहताना बुडून हिंगोलीच्या तरुणाचा मृत्यू शहरावर शोककळा

Hingoli Youth Death: जपानच्या कुरे शहरातील कारुगा बीच पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. शाम संतोष अग्रवाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव

जपानमधील कुरे शहरात पोहताना बुडून हिंगोलीच्या तरुणाचा मृत्यू शहरावर शोककळा

Hingoli Youth Death

हिंगोली (Hingoli Youth Death) : जपानच्या कुरे शहरातील कारुगा बीच पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. शाम संतोष अग्रवाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम हा आयआयटी खरगपूर येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. आयआयटी एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत त्याची सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानुसार तो मागील महिन्यात जपानमधील हिरोशिमा विद्यापीठात गेला होता.

दरम्यान, एका कॉन्फरन्ससाठी तो रविवार, ३० ऑगस्ट रोजी कुरे शहरात गेला होता. तेथून तो मित्रांसोबत कारुगा बीच पार्कच्या समुद्रकिनारी गेला. यावेळी तो ब्रेकवॉटरवरून पाण्यात उतरला, मात्र परत वर आलाच नाही. काही वेळाने जीव रक्षकाला एक तरुण पाण्यावर तरंगताना दिसला. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या (Hingoli Youth Death) घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना ३१  ऑगस्ट सोमवार रोजी मिळाली. या घटनेने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शामचा मृतदेह जपानहून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी सहा ते सात दिवस लागणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

शामचे प्राथमिक शिक्षण हिंगोलीतील एका इंग्रजी शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर त्याने एनआयटी भोपाळ येथून आर्किटेक्टची पदवी घेतली व पुढील शिक्षणासाठी आयआयटी खरगपूर येथे प्रवेश घेतला होता. अभ्यासात हुशार आणि मनमिळावू म्हणून तो मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. त्याचे कुटुंब काही वर्षांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले असून त्याच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीच्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना मृत्यू; IIT खरगपूरकडून गेला होता प्रशिक्षणासाठी

हिंगोलीच्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना मृत्यू; IIT खरगपूरकडून गेला होता प्रशिक्षणासाठी

हिंगोलीतील 25 वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Sep 01, 2026
रक्षाबंधनाला माहेरी जाताना पैनगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू

रक्षाबंधनाला माहेरी जाताना पैनगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू

मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला एका ४४ वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 26, 2026
हिंगोलीतील बेपत्ता झालेल्या युवकाचा विदर्भात आढळला मृतदेह

हिंगोलीतील बेपत्ता झालेल्या युवकाचा विदर्भात आढळला मृतदेह

Hingoli Youth Death: शहरातील सिध्दार्थ नगर भागातील एका ३५ वर्षीय युवकाचा यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाणे हद्दिमध्ये सत्तरमाळ जंगल परिसरात खुन केल्याची घटना उघडकीस आली

Aug 07, 2026
परभणीत राहटी पुलावरुन उडी घेतलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला...!

परभणीत राहटी पुलावरुन उडी घेतलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला...!

Parbhani Dead body: वसमत महामार्गावर गोदावरीच्या असलेल्या राहटी पुलावरुन एका इसमाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना रविवार २ ऑगस्ट रोजी घडली होती. सदर इसमाचा मृतदेह

Aug 03, 2026
परभणीत गोदावरी नदी पात्रात बुडून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

परभणीत गोदावरी नदी पात्रात बुडून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

Parbhani Man Death: गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी गेल्यासमवेत ५० वर्षीय सुरेश तुळशीराम रासवे यांचा पाण्यात बुडून दिव्यांधलेला मृत्यू शनिवार झाला. त्यांचा शोध करूने आलेल्या सहकारी युवक

Jun 21, 2026