हिंगोली युवक मृतदेह

हिंगोलीतील बेपत्ता झालेल्या युवकाचा विदर्भात आढळला मृतदेह

Hingoli Youth Death: शहरातील सिध्दार्थ नगर भागातील एका ३५ वर्षीय युवकाचा यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाणे हद्दिमध्ये सत्तरमाळ जंगल परिसरात खुन केल्याची घटना उघडकीस आली

हिंगोलीतील बेपत्ता झालेल्या युवकाचा विदर्भात आढळला मृतदेह

Hingoli Youth Death

 

खंडाळा पोलिस ठाण्यात आठ आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli Youth Death) : शहरातील सिध्दार्थ नगर भागातील एका ३५ वर्षीय युवकाचा यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाणे हद्दिमध्ये सत्तरमाळ जंगल परिसरात खुन केल्याची घटना उघडकीस आली असुन या प्रकरणात यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने ८ आरोपी निष्पन्न केले. 

याबाबत (Hingoli Youth Death) पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  हिंगोली शहरातील सिध्दार्थ नगर भागातील मंगेश अर्जुन मनवर हा २३ वर्षीय युवक मजूरीच्या कामानिमित्त दररोज जात होता. २ ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे मजुरीच्या कामाला गेला होता. परंतु तो नेहमीप्रमाणे घरी आला नसल्याने नातेवाईकांनी व मित्रांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. तो मिळून आला नसल्याने हिंगोली शहर पोलिसात ४ ऑगस्टला त्याची आई संगिता अर्जुन मनवर यांनी  मंगेश मनवर हा बेपत्ता असल्या बाबतची माहिती दिल्याने हिंगोली शहर पोलिसात नोंद घेण्यात आली होती. ४ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाणे हद्दितील सत्तरमाळ जंगल परिसरात एका अनोळखी इसमाच्या पाठीवर गळ्यावर चाकुने वार करून दगड टाकुन जीवे ठार मारल्याची घटना घडली होती.

यावरून खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर देशी दारूच्या बॉटलची बॅच तसेच पाण्याची बाटली व मुगडाळच्या रिकाम्या पॉकेटची पाहणी केल्यावर भिंगरी देशी दारूच्या रिकाम्या बॉटलीवरील असलेल्या बॅच नंबरवरून गुन्ह्याचे घटनास्थळ ते वाशिम, पुसद रस्त्यावरील हॉटेल धाबे तपासणी करून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचा केला. गुन्ह्याच्या घटनास्थळी आढळून आलेली डीआरईएएम कंपनीची रिकामी पाण्याची बॉटल तसेच ईयुआरओ कंपनीची मुगदाळ कोणत्या भागात विक्री होते, त्याची माहिती घेतली असता पाण्याची बॉटल ही हिंगोली जिल्ह्यात विक्री होत असल्याने अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्या करीता पोलिसांचे पथक हिंगोली परिसरात आले. तपासात सदर मृत व्यक्तीचे मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर रा. सिध्दार्थ नगर हिंगोली येथील असल्याचे तसेच नातेवाईकांनी त्याचे कपडे पाहिल्यानंतर ही ओळख पटली. 

त्यानंतर हा खुन कशासाठी व कोणी केला या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला. ज्यामध्ये मयत मंगेश उर्फ काल्या मनवर यास अजय भालेराव, राधा भालेराव, बाबु शेख यांनी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मार्फत ६ लाख रुपयाची सुपारी देऊन कट रचल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपुस केली असता त्याने राहुल उर्फ महाराज मुकींदा लोखंडे रा. वसंत नगर उमरी ता. मानोरा जि. वाशिम, श्रावण तुकाराम भवाळ रा. उमरी भ्रु. ता. मानोरा जि. वाशिम, सोमनाथ संगित हजारे, विशाल अर्जुन राठोड  रा. शेंदोगे ता. मानोरा जि. वाशिम, अर्जुन अशोक शेळके रा. उमरी खु. ता. मानोरा जि. वाशिम, दिपक लक्ष्मण जाधव रा मागा किन्ही ता. दारव्हा, शुक्रधन उर्फ सिध्दार्थ संतोष जाधव रा. दिग्रस गंगानगर ता. दिग्रस यांनी केला असल्याचे निष्पन्न करून हा गुन्हा निष्पन्न केला. या प्रकरणात खंडाळा पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पाण्याची बॉटल व मुगडाळच्या पाकीटावरून खुनाला फुटली वाचा
खंडाळा पोलिस ठाणे हद्दित सत्तरमाळ जंगल परिसरात अनोळखी मृतदेह आढळून आल्यानंतर घटनास्थळी देशी दारूची बाटली व रिकामी पाणी बॉटल आणि मुगडाळचे रिकामे पॉकेट आढळून आल्यावर ही पाणी बॉटल  व मुगदाळ हिंगोली जिल्ह्यात विक्री होत असल्याचे निष्पन्न होताच यवतमाळ पोलिसांनी तपासात मंगेश उर्फ काल्या मनवर याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न केले. यामध्ये आठ आरोपींचा समावेश असल्याने त्यांच्यावर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून तिघांना अटक झाली आहे. CCTV, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे.

Oct 03, 2026