हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनास नगर परिषदेची असमर्थता

Hingoli Dussehra Festival: ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ साजरा करण्यास नगर परिषद हिंगोलीने असमर्थता दर्शविली आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनास नगर परिषदेची असमर्थता

Hingoli Dussehra Festival

 

मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी तथा दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षांना दिले पत्र

हिंगोली () : येथील ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ साजरा करण्यास नगर परिषद हिंगोलीने असमर्थता दर्शविली आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली यांना अधिकृत पत्र दिले आहे.

नगर परिषद कार्यालयाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दसरा महोत्सवाच्या अनुषंगाने २८ जुलै रोजी सर्व विश्वस्तांची बैठक घेण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.  तसेच राज्य निवडणूक आयोगामार्फत हिंगोली तालुक्यातील आगामी ९५ ग्रामपंचायत निवडणुका आणि जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीची माहिती मागवण्याचे काम सुरू असल्याने या काळात निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या सर्व कामांचा ताण पाहता उपविभागीय अधिकारी तथा दसरा महोत्सव समिती अध्यक्ष आणि तहसीलदार यांचेमार्फत दसरा महोत्सव राबविणे शक्य होणार नाही, असे नगर परिषदेने यापूर्वी कळविले होते आणि आयोजन आपल्या स्तरावरून करण्याची विनंती केली होती. दरम्यान, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांची स्वतः ९४ हिंगोली विधानसभा मतदार संघांतर्गत यादी भाग क्रमांक ३०५ ते ३१९ करिता अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती असून जवळपास विसंगती  व न प्राप्त होणारे  असे एकूण ८१८ फॉर्मवर सुनावणी घ्यायचे काम आहे.

याशिवाय नगरपालिकेचे कर आकारणीचे मागणी बिल वाटप व वसुली, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कामे, न.प. सर्वसाधारण सभेतील ठरावांची विहित मुदतीत अंमलबजावणी आणि मंजूर आकृतिबंधातील उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता नगर परिषदेला दसरा महोत्सव २०२६ चे आयोजन करणे शक्य होणार नाही, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.  

हिंगोलीचा दसरा सर्वदूर प्रसिध्द
हिंगोलीतील श्री सार्वजनिक दसरा महोत्सव मानदास बाबांच्या प्रेरणेने सन १९५५ पासून सुरू करण्यात आलेला आहे. या महोत्सवाला जवळपास ७० वर्ष पूर्ण झाले आहेत. येथील दसरा महोत्सवाची प्रदर्शनी मोठ्या स्वरूपात भरविली जात आहे. परप्रांतातून अनेक व्यवसायीक या प्रदर्शनीमध्ये दुकाने थाटतात. त्याच प्रमाणे रावण दहनला जवळपास १ लाख भाविक उपस्थित असतात. महोत्सवात अनेक स्पर्धाही घेतल्या जातात.

याशिवाय नगरपालिकेचे कर आकारणीचे मागणी बिल वाटप व वसुली, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कामे, न.प. सर्वसाधारण सभेतील ठरावांची विहित मुदतीत अंमलबजावणी आणि मंजूर आकृतिबंधातील उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता नगर परिषदेला दसरा महोत्सव २०२६ चे आयोजन करणे शक्य होणार नाही, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. एकुणच परिस्थितीमध्ये श्री सार्वजनिक दसरा महोत्सव भरविण्यावर पेचप्रसंग निर्माण झाला असताना सोमवारी दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांकडून यंदाच्या वर्षी केवळ रामलिला व रावण दहन करून महोत्सव साजरा करण्यावर भर देत आहेत.

महोत्सव समितीच्या हालचाली गतिमान
हिंगोली नगर परिषदेने दसरा साजरा करण्याकरीता नकार घंटा दर्शविल्याने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्यासह महोत्सव समितीच्या सदस्याकडून हालचाली गतिमान सुरू झाल्या. दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात दसरा व अनेक स्पर्धा घेतल्या जातात. परंतु यंदाची ही अडचण लक्षात घेता केवळ रामलिला आणि रावण दहन या दोन विषयावर अधिक भर दिला जात आहे. या दोन बाबी प्रामुख्याने पार पाडण्याकरीता हालचालीला वेग आला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनाला राबविणे शक्य नाही

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनाला राबविणे शक्य नाही

Hingoli Dussehra Festival: हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली तर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ यंदा महसूल यंत्रणेला राबविणे शक्य नसल्याचे समितीने कळवले

Sep 16, 2026