हिंगोली दसरा महोत्सव

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनाला राबविणे शक्य नाही

Hingoli Dussehra Festival: हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली तर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ यंदा महसूल यंत्रणेला राबविणे शक्य नसल्याचे समितीने कळवले

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनाला राबविणे शक्य नाही

Hingoli Dussehra Festival

 

नगर परिषदेने आयोजन करावे - दसरा समितीचे पत्र

हिंगोली (Hingoli Dussehra Festival) : हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली तर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ यंदा महसूल यंत्रणेला राबविणे शक्य नसल्याचे समितीने कळवले आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि तहसीलदार तथा सचिव, दसरा महोत्सव समिती यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगोली यांना १६ सप्टेंबर रोजी पत्र पाठवले आहे.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक २८ जुलैला सर्व विश्वस्तांची बैठक घेण्यात आली होती. मात्र सध्यस्थितीत भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुषंगाने महसूल यंत्रणेमार्फत सदरील कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणे करिता दिवस रात्र राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत ९४ हिंगोली विधानसभा मतदार संघांतर्गत जवळपास २६४५५ विसंगती आणि न प्राप्त होणारे १७००० एवढे प्रपत्र फॉर्मवर सुनावण्या घेऊन त्यावर अभिप्राय देऊन त्याचे निराकरण करण्याचे काम कालमर्यादेत आहे. तसेच प्राप्त यादीवर दावे हरकती घेऊन अंतिम मतदार यादी ही १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करावयाची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत हिंगोली तालुक्यातील आगामी सार्वत्रिक ९५ ग्रामपंचायत निवडणुकीचे काम सुध्दा प्रगती पथावर आहे. सदरील कार्यक्रमांतर्गत प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण कार्यक्रम पूर्ण होऊन मतदार यादीचा कार्यक्रम सुरु आहे. 

या कार्यक्रमांतर्गत ७७५ सदस्य व ९५ सरपंच निवडून द्यावयाच्या प्रक्रिये करिता तसेच या निगडीत मतदार यादीवरील दावे हरकती व आगामी ग्रामपंचायत निवडणूक पाहता महसूल यंत्रणेवर कामाचा बोजा राहणार आहे. शिवाय राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकरीता माहिती मागविण्याचे काम सुरु असल्याने या काळात सदरील निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ साजरा करण्याचे कार्य हे उपविभागीय अधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व तहसीलदार हिंगोली तथा सचिव दसरा महोत्सव समिती हिंगोली यांचे मार्फत राबविणे शक्य होणार नाही. असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. सदर पत्रावर तहसीलदार तथा सचिव श्रीकांत भुजबळ आणि उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष समाधान घुटकडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनास नगर परिषदेची असमर्थता

हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनास नगर परिषदेची असमर्थता

Hingoli Dussehra Festival: ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ साजरा करण्यास नगर परिषद हिंगोलीने असमर्थता दर्शविली आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी

Sep 21, 2026